Congress candidates list
Congress candidates list  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादीही जाहीर

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यात काँग्रेसने आपली उमेदवारांची चौथी यादीही जाहीर केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी आणखी दोन काँग्रेस उमेदवारांची नावे जाहीर केली. नुवे मतदारसंघात कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा तर वेळ्ळी मतदारसंघात सावियो डिसिल्व्हा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Congress News Updates)

काँग्रेसने (Congress) मंगळवारी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली होती. ज्यात डिचोलीतून मेघश्याम राऊत, थिवीमधून अमन लोटलीकर, कळंगुटमधून मायकल लोबो, पर्वरीत विकास प्रभुदेसाई, सांत आंद्रेमधून अँथनी फर्नांडिस, तर साखळीतून धर्मेश सगलानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंतही आपल्या साखळी मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections) लढवण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत मडकईतून लवू मामलेदार, सांगेतून प्रसाद गावकर, काणकोणमध्ये जनार्दन भंडारी यांचंही नाव जाहीर करण्यात आलं आहे. मडकईतून काँग्रेसची उमेदवारी मिळालेले लवू मामलेदार यांनी तृणमूलमध्ये (TMC) प्रवेश करुन काही दिवसांमध्येच पक्ष सोडला होता. आता मडकईतून त्यांना मगोपच्या सुदिन ढवळीकरांविरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक नक्कीच चुरशीची होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT