Bharatiy Janata Yuva Morcha Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: संसदेत शहांवरील आरोपांचे गोव्यात पडसाद; ‘भाजयुमो’ची काँग्रेस भवनासमोर निदर्शने

Goa BJP: माजी आमदार दामू नाईक, भाजयुमोचे गोवा प्रदेशाध्यक्ष समीर मांद्रेकर यांच्यासह भाजयुमोचे कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयपासून निषेध फेरी काढली.

गोमन्तक डिजिटल टीम

BJP Goa Protest

पणजी: गेले दोन दिवस लोकसभेत काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यावरून राजकारण सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सुरू असलेला हा प्रकार निषेधार्ह असल्याचा दावा करून गुरुवारी ‘भाजयुमो’ने काँग्रेस भवनासमोर जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

माजी आमदार दामू नाईक, भाजयुमोचे गोवा प्रदेशाध्यक्ष समीर मांद्रेकर यांच्यासह भाजयुमोचे कार्यकर्त्यांनी दुपारी भाजप कार्यालयपासून निषेध फेरी काढली. काँग्रेस भवनासमोर येऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, यावेळी दामू नाईक म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्यावर काँग्रेसने अन्याय केला. माजी पंतप्रधान नेहरूंच्या काळात त्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली. ‘भारतरत्न’सारखा सन्मान त्यांना देण्यातही काँग्रेसला नकोसे वाटत होते.

राज्यघटनेवरील चर्चेत गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांवर काँग्रेसच्या राजवटीत कसा अन्याय झाला, याचा आलेख मांडला आणि त्यांनी सर्व माहिती पटलावर ठेवली होती.

कॉंग्रेसचे कारनामे जनतेपर्यंत नेऊ !

डॉ. आंबेडकरांचा शहा यांनी अपमान केल्याची व्हिडिओ क्लिप तयार करून ती व्हायरल केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांंनी गुरुवारी संसदेसमोर आंदोलन करणाऱ्या भाजपच्या खासदारांना धक्काबुक्की केली. या सर्व घटनेचा भाजपच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. काँग्रेसच्या या वागणुकीचा आम्ही निषेध करतो. भाजपच्यावतीने संविधान दिवस साजरा होत आहे. काँग्रेसने सुरू केलेले कारनामे राज्यातील जनतेपर्यंत नेले जातील, असेही दामू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT