Dharmesh Saglani Congress Dainik Gomantak
गोवा

जनता मुख्यमंत्र्यांना घरी बसविण्यास सज्ज : सगलानी

साखळी येथील काँग्रेस प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, कार्यकर्त्यांची गर्दी

दैनिक गोमन्तक

साखळी : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी हुकूमशाही आणि सूडबुध्दीची निती वापरुन लोकांचा छळ चालवला आहे. त्यांनी नकारात्मक पध्दतीचे राजकारण गेली दहा वर्षे केले, त्यामुळे जनतेचे मन दुखावले आहे. जनता या मुख्यमंत्री आणि भाजप सरकारला कंटाळली असून या निवडणुकीत वचपा काढत मुख्यमंत्र्यांना घरी बसवण्यास सज्ज झाली आहे, असा निशाणा साखळीचे काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांनी केला आहे. (Dharmesh Saglani Congress News Updates)

साखळी मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज साखळी येथील 'लाडजी टॉवर्स'मध्ये करण्यात आले. यावेळी साखळी मतदारसंघातील सर्व काँग्रेस नेत्यांनी एकजुटीचे दर्शन घडवले आणि एकत्र राहून काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

काँग्रेस प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद काणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रभारी टी.रवी, माजी आमदार प्रताप गावस उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी (Pramod Sawant) प्रत्येक गोष्टीमध्ये दबावतंत्र लादून आपला आणि कार्यकर्त्यांचा छळ केला आहे, त्याअर्थी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीची भीती वाटू लागली आहे. जनतेच्या मनात मुख्यमंत्री आणि सरकारविरोधात असंतोष खदखदत आहे, हे आम्ही प्रचारात फिरताना दिसून आले, असा निशाणा धर्मेश सगलानी यांनी साधला.

लोक आम्हाला फोन करुन पाठिंबा देत आहेत. आम्ही लोकांना शब्द दिला होता की उमेदवारी कुणालाही लाभल्यास एकत्र राहून काम करु. आज आम्ही शब्द पाळला आहे. जनतेने आपले कार्य पाहिलेच आहे. आमदार बनवून अधिक सामाजिक कार्याची संधी द्यावी, असे आवाहन सगलानी यांनी केले.

काँग्रेस प्रभारी टी.रवी यावेळी बोलताना म्हणाले की, सर्व्हेनुसार गोव्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित आहे. साखळीतून सगलानी यांना जनतेने विधानसभेत पाठवावे. काँग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते एकत्र असून आमच्यामध्ये फुटीची स्वप्ने भाजपने (BJP) पाहू नयेत. आम्ही एकजुटीने काम करुन काँग्रेसला विजय मिळवून देऊ, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Comunidade Land Bill: दुरुस्ती विधेयकाला 2 कोमुनिदादींचा पाठिंबा; चिकोळणा, चिखलीचा महसूल वाढ, लाभांशाचा दावा

Goa Rain: गोव्यात पावसाची 'नव्वदी' पार! ऑरेंज अलर्ट कायम; वाळपई, धारबांदोड्यात मुसळधार

Betul: उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे गुंडाराज! जाब विचारणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; झारखंडच्या 6 जणांना अटक

Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

Rashi Bhavishya 18 August 2025: व्यवसायात प्रगती,कुटुंबातील मतभेद मिटतील; आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल

SCROLL FOR NEXT