दयानंद नार्वेकर ‘अपक्ष’ लढणार!

‘आप’ने डावलल्याने नाराजी; पर्वरीत समीकरण बदलणार
Dayanand Narvekar and Rohan Khaunte in Porvorim
Dayanand Narvekar and Rohan Khaunte in PorvorimDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी : मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून दयानंद नार्वेकर यांना पुढे आणायला हवे होते,अशी अपेक्षा नार्वेकर समर्थकांनी बाळगली होती. मात्र पक्षाने नवागत अशा ॲड. अमित पालेकर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले. त्यामुळे नार्वेकरांपेक्षा त्यांचे कार्यकर्ते दुखावल्याचे जाणवत होते. याचेच पर्यवसान ते आता अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्यात होणार आहे. त्यामुळे पर्वरीतील समीकरणे बदलण्याची शक्यता दिसू लागली आहे.

Dayanand Narvekar and Rohan Khaunte in Porvorim
अमित पालेकरांनी केला नीलेश काब्रालांच्या संपत्तीचा पर्दाफाश

दयानंद नार्वेकर हे गोव्याच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. सातवेळा निवडून आलेले व उपमुख्यमंत्रिपद तसेच सभापतिपदापर्यंत मजल मारलेले,असे हे गोव्यातील एक प्रमुख नेते. 1977 ते 2012 पर्यंत मधला 1989 चा अपवाद वगळता ते सातत्याने निवडून आले आहेत.

मात्र 2012 साली त्यांचा पराभव झाल्यानंतर ते राजकीय विजनवासात गेल्यासारखे वाटत होते. 2017 मध्ये आपल्याला कॉंग्रेसचे (Congress) तत्कालिन प्रदेशाध्यक्ष फालेरो यांनी पर्वरीची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते, पण ऐनवेळी अपक्ष रोहन खंवटे यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला,असे नार्वेकर सांगतात. याचा निषेध म्हणून नंतर नार्वेकरांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता. यावेळी ते आपतर्फे निवडणूक लढविणार, असे दिसत होते. काही महिन्यापूर्वी त्यांनी आपमध्ये (Aam Aadmi Party) प्रवेश केला होता. तेव्हा पक्ष त्यांना पर्वरी वा हळदोण्याची उमेदवारी देईल, असे वाटत होते.पण पक्षाने डावलल्याने त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

Dayanand Narvekar and Rohan Khaunte in Porvorim
10 वर्षानंतर पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश, गोव्यात 12 उमेदवार लढणार

आपने डावलल्याने नार्वेकर समर्थकांत नाराजी !

आम आदमी पक्षाच्या राजीनाम्याबाबत माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांना विचारले असता दयानंद नार्वेकर यांनी सांगितले,की आपच्या श्रेष्ठींना आपण आपल्याला पर्वरीत (Porvorim) उमदेवारी हवी, असे सांगितले होते. पण आपने त्यांना हळदोण्यातून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले. आपला पर्वरीबाबत आग्रह कायम होता. पण आपने ही उमेदवारी रितेश चोडणकर यांना दिली. कार्यकत्ल्मुर्त्यांच्या आग्रहामुळे आपल्याला आप सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला

Dayanand Narvekar and Rohan Khaunte in Porvorim
'या' नेत्यानंही उमेदवारी डावलून दिला उत्पल पर्रीकरांना पाठिंबा

खंवटेंची भाजपशी वरवर दिलजमाई !

सध्या पर्वरीत भाजपने रोहन खंवटे यांना उमेदवारी दिली आहे. ते या मतदारसंघातून दोनदा अपक्ष म्हणून निवडून आले असल्यामुळे त्यांना अजूनही भाजप कार्यकर्त्यांनी स्वीकारलेले दिसत नाही. वरवर दिलजमाई झाल्यासारखी वाटत असली तरी कार्यकर्त्यांच्या मनातली जखम भळभळताना दिसत आहे. यामुळे ते नार्वेकरांकडे ‘आपला’ उमेदवार म्हणून बघू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com