Goa Loksabha Congress Dainik Gomanatk
गोवा

Goa Congress Loksabha Candidate: काँग्रेस उमेदवारांसाठी 'और थोडा इंतजार', दिल्लीतील बैठक रद्द

Goa Congress Loksabha Candidate: गोवा लोकसभेसाठी काँग्रेसकडून अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

Pramod Yadav

Goa Congress Loksabha Candidate

गोवा लोकसभेसाठी काँग्रेसकडून अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. भाजपने दक्षिणेतील उमेदवाराची घोषणा केल्यानंतर आज (१८ मार्च) काँग्रेस उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याबाबत दिल्लीत होणारी बैठक रद्द झाल्याने लोकसभेसाठी काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार यासाठी और थोडा इंतजार करावा लागणार आहे.

मागील काही दिवसांपासून गोव्यात लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याचा तिढा कधी सुटणार याबाबत उत्सुकता आहे. उमेदवार निवडीसाठी दिल्लीत आज (सोमवार) बैठक आयोजित करण्यात आली होती.

दिल्लीतील नियोजित बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली आहे. तसेच, येत्या दोन दिवसांत याबाबत बैठक होईल, असे पाटकर यांनी सांगितले.

भाजपकडून दक्षिणेतील उमेदवाराची घोषणा आज (सोमवारी) केली जाण्याची शक्यता आहे. भाजप दक्षिणेत महिला उमेदवारालाच संधी देऊ शकतो हे जवळपास निश्चित झाले आहे. पण, हा चेहरा कोण असणार याबाबत सस्पेंस कायम आहे.

भाजपचे उत्तरेतील चित्र स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस भाजपच्या दक्षिणेतील उमेदवार घोषणेची वाट पाहत आहे. भाजपचे दोन्ही उमेदवार कोण हे समजल्यानंतर काँग्रेस उमेदवारांची घोषणा करेल.

काँग्रेस दक्षिणेत विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या उमेदवारीचा विचार करत आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला इंडिया आघाडीच्या घटक पक्ष गोवा फॉरवर्डकडून विरोध होताना दिसत आहे. तर, उत्तरेत काँग्रेसचा चेहरा कोण असणार याबाबत कोणी एक नाव आघाडीवर नसल्याने पक्षाकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT