Goa Fake Currency: 'बच्चों की बँक'चे पैसे देऊन भरले पेट्रोल, गोव्यात पंप चालकाला दोन हजारांचा गंडा

Counterfeit of Rs 500 notes exchanged at petrol pump: पंपावर गर्दी असलल्याने कामगाराने नोटा तपासून घेतल्या नाहीत.
Goa Fake Currency
Goa Fake CurrencyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fake Currency

गोव्यात बनावट पाचशे रुपयांच्या नोटा वापरुन पेट्रोल भरल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. कार चालकाने धारगळ येथील पंपावर पेट्रोल भरल्यानंतर पाचशेच्या चार बनावट नोटा देऊन पोबारा केला. रविवारी रात्री राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पंपावर हा घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असणाऱ्या एका पंपावर चारचाकी तेल भरण्यासाठी आली. पंपावर चालकाने दोन हजार रुपयांचे पेट्रोल भरले आणि पंपावरील कमागाराला पाचशे रुपयांच्या चार नोटा दिल्या.

पंपावर गर्दी असलल्याने कामगाराने नोटा तपासून घेतल्या नाहीत. दरम्यान, रात्री हिशोब करताना चालकाने दिलेल्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले.

Goa Fake Currency
Goa Beach: गोव्याच्या एका किनाऱ्यावरील हे दृश्य कधी बदलणार?

ग्राहकांने दिलेल्या पाचशेच्या नोटांवर 'भारतीय बच्चों की बँक' असे लिहल्याचे आढळून आले.

दरम्यान, पंप मालकाकडून याप्रकरणी पेडणे पोलिसांत गुन्हा नोंद केला असून, पोलिसा वाहन चालकाचा शोध घेत आहे. पोलिसांनी पंपावरील सीसीटीव्ही फुटेज देखील घेतले आहे. सीसीटीव्हीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com