Goa Loksabha Congress Dainik Gomanatk
गोवा

Goa Politics: ‘आऊट ऑफ बॉक्स’ निर्णयाची काँग्रेसलाही गरज

Goa Politics: ‘नहले पे देहला’? दक्षिणेतील उमेदवार उद्या ठरणार

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

सुशांत कुंकळयेकर

अनेक निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होतील आणि कदाचित बंडखोरीही करतील, हे पक्के ठाऊक असतानाही भाजपने दक्षिण गोव्यासाठी ‘आऊट ऑफ बॉक्स’ निर्णय घेताना पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिली.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसच्‍या उमेदवारांची नावे 27 मार्चला जाहीर केली जातील, असे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसला जवळ असलेले राजकीय विश्‍‍लेषक ॲड. क्लिओफात कुतिन्हो आल्मेदा यांची यावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्‍हणाले की, आता काँग्रेस पक्षानेही आपल्या पारंपरिक राजनीतीचा वापर न करता असाच अनपेक्षित व कलाटणी देणारा निर्णय घेणे आवश्यक आहे.

मुख्य म्हणजे दक्षिण गोव्यावर बाहेरचा उमेदवार लादून सर्व मतदारांना भाजपने गृहीत धरले आहे व हे या मतदारांना प्रभावीपणे पटवून देणारा उमेदवार काँग्रेसने उभा केला पाहिजे, असे ते म्हणाले. भाजपने पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देऊन आपल्या कार्यकर्त्यांची मने काही प्रमाणात दुखावली असली तरी धेंपे घराण्याला प्रतिनिधित्व देऊन सासष्टीतील ‘फुटबॉल प्रेमाला’ जोजवले आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

यासंबंधी बोलताना अन्य एक राजकीय विश्‍‍लेषक राधाराव ग्रासियस म्हणाले, पल्लवी हे नाव कदाचित दक्षिण गोवा विशेषतः सासष्टीसाठी अपरिचित असेल, पण ‘धेंपो’ हे नाव परिचयाचे आहे. धेंपो फुटबॉल क्लबबद्दल सासष्टीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये ममत्व आहे. एवढेच नव्हे तर गोवा फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून पल्लवी यांचे पती श्रीनिवास धेंपे हे अनेक फुटबॉल क्लबांच्या व्यवस्थापनांशी जवळ आहेत हे विसरून चालणार नाही.

सारस्वत विरुद्ध भंडारी

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांना पुन्हा उमेदवारी देऊन भाजपने आपल्यावर नाराज असलेल्या भंडारी समाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी या पक्षाबद्दल समाजात असलेला राग पूर्णपणे शमलेला नाही. अशा परिस्थितीत भाजपने यावेळी दक्षिण गोव्यात सारस्वत उमेदवार उभा केला आहे.

त्याला उत्तर म्हणून काँग्रेस पक्ष भंडारी समाजाचे गिरीश चोडणकर यांना उमेदवारी देऊ शकतो. त्‍यामुळे दक्षिण गोव्यातील ही लढत सारस्वत विरुद्ध भंडारी अशी होऊ शकते. मात्र, गिरीश किती भंडारी मते आपल्यापाशी ओढू शकतात यावर बरेच काही अवलंबून आहे. भाजपमधील नाराज भंडारी नेत्यांचाही त्‍यांना पाठिंबा मिळू शकतो. एसटी समाजामध्येही भाजपविरोधात नाराजी आहे. ही नाराजी दक्षिणेत भाजपला मारक ठरू शकते.

‘बाबा धेंपे’ फॅक्टर महत्त्वाचा

पल्लवी धेंपे यांचे पती बाबा (श्रीनिवास) धेंपे यांचा फुटबॉल खेळामुळे सासष्टीकडे असलेला ‘कनेक्ट’ विसरून चालणार नाही. चर्चिल आलेमाव, ज्योकिम आलेमाव यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. विजय सरदेसाई यांनाही ते जवळ आहेत. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाणारे फ्रान्सिस सार्दिन आणि जीएफएमुळे एल्विस गोम्स यांच्‍याशीही त्‍यांचे घनिष्‍ठ संबंध आहेत. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर विरोधकांना आतून मदत करणे ही काँग्रेसच्‍या बंडखोरांची जुनी खोड आहे.

दक्षिण गोव्यात ख्रिस्ती उमेदवार उभा केल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असे बोलले जात आहे. त्यामुळे दक्षिण गोव्याची उमेदवारी काँग्रेसने पुन्हा फ्रान्‍सिस सार्दिन यांनाच द्यावी असा विचार पुढे येतोय. पण त्यांचे वय, कार्यशैली या विचाराच्‍या आड येतेय. अशा परिस्थितीत युरी आलेमाव हे काँग्रेससाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र युरी त्यासाठी मनाने तयार व्हायला पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT