Goa Shigmotsav 2024: डिचोलीत मुलांसह महिलांनी लुटला रंगपंचमीचा आनंद

Goa Shigmotsav 2024: एकमेकांवर गुलालाची उधळण करीत डिचोलीतील विविध भागात आज (सोमवारी) रंगपंचमी अर्थातच 'होळी उत्सव' उत्साहात साजरा करण्यात आला.
Holi
Holi Dainik Gomantak

Goa Shigmotsav 2024:

एकमेकांवर गुलालाची उधळण करीत डिचोलीतील विविध भागात आज (सोमवारी) रंगपंचमी अर्थातच 'होळी उत्सव' उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांसह काही ठिकाणी महिलांही रंगपंचमीच्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

डिचोली शहरातील बाजार, नाईकनगर, सर्वण आदी विविध भागात आज सकाळपासूनच रंगोत्सवाची धूम सुरु होती. सर्वत्र गुलालाची उधळण सुरु होती. लहान मुलांमध्ये तर भलताच उत्साह संचारला होता.

सर्वत्र लहान मुले एकमेकांवर पाणीमिश्रित रंगांनी भरलेल्या पिचकाऱ्या मारून आणि बलून फोडून रंगपंचमी साजरी करताना दिसून येत होते. डिचोलीत वास्तव्य करुन असलेल्या कन्नडीगांनीही यंदा रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली.

Holi
Rain In Surla: तांबडीसुर्लात कोसळल्या पावसाच्या सरी

डिचोलीतील वेगवेगळ्या भागात सध्या शिगम्याचा उत्साह संचारला आहे. बाळगोपाळ शिगम्याच्या आनंदात न्हावून गेले आहेत. रविवारी रात्री बहूतेक गावोगावी होळी पेटविल्यानंतर शिगमोत्सवाला प्रारंभ झाला आहे. वाजतगाजत होळी आणल्यानंतर गावागावात पारंपरिक ठिकाणी विधिवत पूजन करुन होळी रोवण्यात आली.

शिगमोत्सवानिमित्त सर्वत्र ढोल-ताशांचा 'घुमचे कटर घुम' घुमघुमू लागला आहे. शबय, चोरोत्सवासह बहुतेक भागात उद्यापासून (मंगळवारी) रोमटांना सुरवात होणार आहे. पुढील काही दिवस शिगम्याचा उत्साह कायम दिसून येणार आहे.

Holi
Boxing Tournament: गोव्याच्या लक्ष्मी लमाणीला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

गडेत्सवाचा उत्साह


गोमंतकासह शेजारील राज्यांनी प्रसिद्धीस पावलेल्या साळ येथील गडेत्सवाला आजपासून (सोमवारी) मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे. बुधवारपर्यंत तीन दिवस हा गडेत्सव साजरा करण्यात येणार असून, शेवटच्या दिवशी गडेत्सवाला प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता आहे. साळ दरम्यान, कुडणेसह बोर्डे, कारापूर, पिळगाव येथेही गडेत्सव होत असून, यंदाही वरील भागात गडेत्सव पारंपरिकपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com