Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'भाजपनं गोव्याला नशायुक्त राज्य बनवलं', काँग्रेसचा सावंत सरकारवर घणाघात

Congress Targets BJP Goa: राज्यातील अमलीपदार्थांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी रोखण्यात राज्‍य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोव्याचे देशातील अग्रगण्य पर्यटनस्थळ म्हणून असलेले स्थान जपण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, आपल्या निष्क्रियतेमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे गोव्याला ‘ड्रग्स कॅपिटल’ अशी ओळख मिळवून दिली आहे, असा घणाघाती आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले ‘नशामुक्त भारत अभियान’ गोव्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या काळात जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गोव्याचे ‘नशायुक्त गोवा’मध्ये रूपांतर झाले आहे. वाढता अमलीपदार्थांचा विळखा हा भाजप सरकारला स्वतःच्या प्रमुख अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेल्या अपयशाचा जाहीर पुरावा आहे,

अशी टीका पणजीकर यांनी केली. गोव्यात राष्ट्रीय महामार्ग, किनारपट्टी, पर्यटनस्थळे, शैक्षणिक संस्था, उच्चभ्रू वस्त्यांपर्यंत अमलीपदार्थांचे जाळे पोहोचले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे पूर्णपणे झालेले पतन त्यातून स्पष्ट होत आहे, असे पणजीकर यांनी नमूद केले.

‘आप’च गोव्यात ड्रग्समाफियांना नष्ट करेल!

राज्यातील अमलीपदार्थांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी रोखण्यात राज्‍य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्‍यामुळे गृहमंत्री या नात्‍याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत, पंजाबमध्ये करून दाखवल्याप्रमाणे केवळ आम आदमी पक्षच अमलीपदार्थांच्या माफियांना नष्ट करू शकतो, असा दावा ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केला. देशाला नशामुक्त करण्याबद्दल बोलण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आधी स्वतःच्या मतदारसंघाला नशामुक्त करावे, असे आव्‍हान नाईक यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT