मडगाव: गोव्यातील (Goa) दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award) विजेते दामोदर मावजो (Damodar Mavzo) यांचे आज गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई (Goa Governor Sreedharan Pillai) यांनी त्यांची त्यांच्या माजोर्डा येथील घरी भेट देऊन अभिनंदन केले. ही भेट राज्यपालांची असली तरी येथे दोन साहित्यिकांच्याच गप्पा रंगल्या.
राज्यपाल श्रीधरन पिल्लई हे स्वतः साहित्यिक असून एकूणच भारतीय साहित्यविषयी त्यांना आस्था आहे. मावजो यांच्याकडे झालेल्या त्यांच्या चर्चेत हेच दिसून आले. यावेळी बोलताना पिल्लई यांनी नवीन पिढी साहित्यापासून दूर जात आहे ही खंत व्यक्त करताना या पिढीला पुन्हा साहित्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली.
मावजो याना ज्ञानपीठ मिळाल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हेही उपस्थित होते. यावेळी पिल्ले यांनी आपण लिहिलेली काही पुस्तके मावजो याना भेट दिली तर मावजो यांनीही आपली पुस्तके राज्यपालांना भेट दिली.
यावेळी बोलताना मावजो यांनी आपण प्रस्थापितांच्या चुकांच्या विरोधात लिहिणारा साहित्यिक अशी बोलता बोलता ओळख करून दिली यावर पिल्ले यांनी असे साहित्यिक राज्यात असणे ही भाग्याची गोष्ट असून सकारात्मक विरोध ही लोकशाहीची नितांत गरज असे मत व्यक्त केले.
राज्यपालांच्या या भेटीबद्दल 'गोमंतक'शी बोलताना मावजो यांनी , राज्यपालाबरोबर झालेली चर्चा माझ्यासाठी आनंद देणारी गोष्ट होती. मला वाटले होते माझे अभिनंदन करून ते पाच दहा मिनिटात जातील. पण त्यांनी सुमारे 45 मिनिटे माझ्याशी आस्थेने गप्पा मारल्या. महत्वाचे म्हणजे या गप्पात राजकारण कुठेही नव्हते. या फक्त सहित्यावर गप्पा होत्या.
काल रात्री काँग्रेसच्या प्रचार समितीचे सह निमंत्रक एल्विस गोम्स यानी आपल्या सहकाऱ्यासह मावजो यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्याबरोबर सिद्धार्थ कारापूरकर हेही उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.