कोकणीप्रेमींचा आनंद गगनात मावेना..!

कोकणीला आता मावजो यांच्‍या रुपाने दुसऱ्यांदा पुरस्‍कार मिळाला आहे.
Konkani Received Jnanpith Award for the second time
Konkani Received Jnanpith Award for the second timeDainik Goamntak
Published on
Updated on

कोकणी भाषा किती सशक्त आहे, याची प्रचिती सर्वांनाच आलीय. कथा आणि कादंबरीकार दामोदर मावजो (Damodar Mauzo) यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार (57th Jnanpith Award) मिळाल्‍याचे जाहीर होताच सर्व कोकणीप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला. सासष्‍टी तालुक्यातील ख्रिश्‍‍चन कुटुंबे व समाजजीवन यांचे वर्णन त्यांच्या अनेक कथांमध्‍ये प्रकर्षाने येते. कारण ते राहतातच कॅथलिक समाजाचे (Catholic society) बाहुल्य असलेल्या माजोर्डा येथे.

कोकणी लेखकांना रायटर बरोबर फायटर व्हावं लागलं आणि त्‍यांची शक्ती, उर्जा ही संघर्ष, चळवळ, आंदोलन, संप यातच मोठ्या प्रमाणात खर्च झाली. तरीही लेखक उत्साहाने लिहित राहिले.

Konkani Received Jnanpith Award for the second time
कोकणीतले नामवंत साहित्यिक दामोदर मावजो ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी

कोकणीला सर्व मान मिळून साहित्य अकादमीची मान्यता मिळाली. कोकणी भाषा आठव्या अनुसूचित समाविष्ट झाली. रवींद्र केळेकर यांना 2006 साली प्रथम ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला. ते स्वातंत्र्यसैनिक, पर्यावरणप्रेमी होते. गांधी विचारांचे उपासक होते. ‘ज्ञानपीठ’ मिळाल्यावर दिलेल्या मुलाखतीत आपल्या छत्राखाली दिलीप बोरकर, मुकेश थळी यांसारखे लेखक घडले याचा आनंद आहे, असे ते म्हणाले होते. त्यांची साहित्य संपदा विपुल आहे. त्‍यांच्‍यानंतर कोकणीला आता मावजो यांच्‍या रुपाने दुसऱ्यांदा पुरस्‍कार मिळाला आहे.

Konkani Received Jnanpith Award for the second time
'न भुतो न भविष्यती' आसामने दिला जगाला कवितेतून संदेश!

1 ऑगस्‍ट 1944 साली जन्मलेले दामोदर मावजो यांचा ‘गांथन’ हा पहिला कथासंग्रह ‘जाग’ प्रकाशनतर्फे 1971 साली प्रकाशित करण्‍यात आला. त्यांच्या कथांमध्‍ये ताकद, चुरचुरीत संवाद व भाषेचे सौंदर्य दिसतं. कथेतील अंतप्रवाह फारच सूचक व लक्षवेधी असतात. ख्रिश्‍‍चन समाजजीवनातील व्‍यथा आणि विसंगती, लबाडी, भावार्थी स्वभाव असे त्यांच्या कथांचे विषय असतात. ‘जागरणां’, ‘रुमडफूल’, ‘भुरगी म्हगेली तीं’, ‘सपनमोगी’ आणि हल्लीच प्रकाशित झालेला ‘तिश्टावणी’ हे त्यांचे कथासंग्रह. कथाकार चंद्रकांत केणी यांच्यासमवेत कोकणी कथांचा सशक्त पाया त्यांनी घातला. अनेक कथाकारांना मार्गदर्शन केले. कथा-संमेलनेही भरवली.

भाई मावजो यांनी कोकणी भाषा (Konkani language) आणि साहित्याची मनोभावे सेवा केलीय. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळवून त्यांनी कोकणीचा ध्वज आणखी उंचावर नेला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. मावजो यांची ‘कार्मेलीन’ ही पहिली कादंबरी. 1983 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार या कादंबरीला लाभला. कॅथलिक समाजाचे तत्कालीन वर्णन या कादंबरीत आहे. ‘दिनार’ मिळतील या हव्यासाने अरब देशांत जाणाऱ्या महिलांच्या आर्त व्यथा या कादंबरीत चित्रित केल्या आहेत. त्यांची ही वास्तववादी अशी कादंबरी. पहिली छोटेखानी ‘सूड’ ही कादंबरी 1975 साली प्रसिद्ध झाली. ‘सुनामी सायमन’ ही देशात आलेल्‍या सुनामीवर आधारीत कादंबरी 2009 मध्‍ये प्रसिद्ध झाली. हल्लीच त्यांची चौथी ‘च्या मारुं काय जीव दिवं!’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आहे.

सखाराम शेणवी बोरकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com