Akshat Kaushal Dainik Gomantak
गोवा

Loud Music Issue: ड्युटी मास्‍तर रामा परब यांच्या निलंबनाच्‍या आदेशातही घोळ! उलटसुलट चर्चांना ऊत

Rama Parab Suspension: १५ ऑगस्ट २०२४ रोजी तक्रार आली असताना १६ जून २०२४ या तारखेने त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हणजूण पोलिस स्थानकातील कॉन्स्टेबल तथा ड्युटी मास्‍तर रामा परब याच्या निलंबनाबाबत पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी त्‍याच्‍या निलंबनाचा आदेश जारी करताना घोळ घातल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

रामा परब याच्याविरोधात १५ ऑगस्ट २०२४ रोजी तक्रार आली असताना अधीक्षक कौशल यांनी मात्र १६ जून २०२४ या तारखेने त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

हणजूण येथील विष्णू शिरोडकर नामक व्यक्तीने रामा परबविरोधात उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांच्या नावे तक्रार केली होती. हा कॉन्स्टेबल भ्रष्टाचारी असून, आपल्‍या मर्जीतील काही पोलिस कॉन्स्टेबल्सनाच ठरावीक ठिकाणी ड्युटीवर पाठवत असल्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या तक्रारीची दखल घेत त्यांनी स्वहस्ताक्षराने शेरा मारला होता.

पोलिस अधीक्षक म्‍हणतात, ती ‘नजरचूक’

रामा परब याच्‍याविरोधात असलेले आरोप खूपच गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्वरित त्याच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात यावा, असे त्या तक्रारीत नमूद करण्‍यात आले होते. आता उघडकीस आलेल्‍या तारखेच्‍या घोळामुळे रामा परब याच्‍या निलंबन प्रकरणाकडे संशयाने पाहिले जात आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण करताना पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ती ‘नजरचूक’ असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT