Loud Music Issue: खरंच निष्काळजीपणा की पदाचा गैरवापर? निलंबनाचे कारण काय?

Constable Suspension: कॉन्‍स्‍टेबल ड्युटी मास्‍तर रामा परब नाहक लक्ष्‍य, पोलिसांमध्‍ये तीव्र नाराजी
Constable Suspension: कॉन्‍स्‍टेबल ड्युटी मास्‍तर रामा परब नाहक लक्ष्‍य, पोलिसांमध्‍ये तीव्र नाराजी
Goa Noise Pollution Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हणजूण पोलिस स्थानकातील ड्युटी मास्‍तर रामा परब यांच्‍या निलंबनानंतर पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला हणजूण परिसरात एस्कॉर्ट वाहन देण्यास त्‍यांनी केलेला निष्काळजीपणा की आपल्‍या पदाचा गैरवापर करून ठरावीक पोलिसांची किनारपट्टी भागात केलेली नेमणूक, नेमके कारण काय? याबाबत पोलिसांमध्‍ये तीव्र नाराजी पसरली आहे.

दरम्‍यान, पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी रात्री एका मेसेजद्वारे प्रशासकीय कारणास्‍तव निलंबन केल्‍याचे स्‍पष्‍टीकरण दिले. ‘पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकारी किंवा पोलिसस्थानक प्रमुखाच्या आशीर्वादाशिवाय गैरप्रकार व भ्रष्टाचार होऊच शकत नाही. जेव्हा प्रकरण अंगावर शेकते असे वाटू लागले की वरिष्ठ अधिकारी आपले हात वर करतात व कोणाला तरी बळीचा बकरा बनवतात. असे प्रकार यापूर्वी अनेकदा घडलेले आहेत’, अशा प्रतिक्रिया राजकीय नेत्‍यांनी दिल्‍या आहेत.

‘एक वरिष्ठ आयएएस अधिकारी हे हणजूण येथे जात होते. सलग सुट्ट्या आल्याने समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ होती. त्‍यामुळे तेथे वाहनांची कोंडी झाली होती. त्‍यामुळे त्‍या अधिकाऱ्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोन करून पीसीआर रॉबर्ट पाठवण्यास सांगितले. त्यानुसार हणजूण पोलिस स्थानकातील ड्युटी मास्‍तर रामा परब यांनी वाहन पाठवण्यासाठी प्रयत्न केले.

पीसीआर रॉबर्ट व्यस्त असल्याने त्यांनी मोटारसायकल रॉबर्ट पाठवला. मात्र तोसुद्धा वेळेत पोहोचला नाही. त्यामुळे या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त करत पोलिस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच संबंधित पोलिसांविरोधात कारवाई करा, अशी सूचनाही केली’, असे कथानक काल समोर आले, अर्थात ते अधीक्षकांनी फेटाळत ध्‍वनिप्रदूषण प्रकरणी कारवाई झाल्‍याचे जाहीर केले होते.

Constable Suspension: कॉन्‍स्‍टेबल ड्युटी मास्‍तर रामा परब नाहक लक्ष्‍य, पोलिसांमध्‍ये तीव्र नाराजी
Loud Music Issue: ध्‍वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा! स्‍थानिकांचे सलग तिसऱ्या रात्री आंदोलन

वज्रमूठ कायम : ‘हम होंगे कामयाब एक दिन...’

हणजूण-वागातोर येथील किनारी भागातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आज रविवारी सलग चौथ्या रात्री स्थानिकांनी शांततेत निदर्शने केली. तसेच ‘हम होंगे कामयाब एक दिन.. हो हो.. मन में है विश्‍‍वास, पूरा है विश्‍‍वास हम होंगे कामयाब एक दिन’ ही गीत गाऊन तसेच मेणबत्त्या व विविध फलक हातात धरून या आंदोलनाचा समारोप केला. परंतु ही लढाई संपलेली नाही असे म्हणत लोकांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

हणजूण पोलिस स्थानकातील पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन हे निव्वळ प्रशासकीय कारणास्तव झाले आहे. इतर सर्व वृत्त पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. त्याचा या निलंबनाशी काहीच संबंध नाही.

अक्षत कौशल (पोलिस अधीक्षक, उत्तर गोवा)

हणजूण पोलिस स्थानकाच्या ड्युटी मास्तरचा नाहक बळी दिला आहे. पोलिस खात्यात कधी कोणालाही बळीचा बकरा बनवले जाते. खरे तर कारवाई पोलिस निरीक्षक किंवा पोलिस उपअधीक्षकांवर व्हायला हवी होती. महत्त्वाची बाब म्हणजे उच्च न्यायालयाचा आदेश असूनही पोलिस निरीक्षक ध्‍वनिप्रदूषणावर कारवाई करतात का, हे तपासले पाहिजे.

ॲड. अमित पालेकर (निमंत्रक, आम आदमी पक्ष)

हणजूणचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांची प्रतिमा भ्रष्टाचारी आहे. या निरीक्षकाच्या वरदहस्तामुळे तेथे ‘रहित क्लब'' बेकायदेशीरपणे चालत होता. मे महिन्यात तो बंद करण्यात आला. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्या क्लबची पाणी, वीजजोडणी तोडली होती. ड्युटी मास्‍तरला बळीचा बकरा बनवले. याबाबत पोलिस महासंचालकांना निवेदन पाठविले आहे.

अमित पाटकर, (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com