Mormugao Municipality Dainik Gomantak
गोवा

मुरगावात मासळी विक्रेत्यांकडून सोपो गोळा करण्यामध्ये गफला

मुख्याधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश

दैनिक गोमन्तक

वास्को: मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांच्या सोपो गोळा करण्यामध्ये गफला होत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मासळी मार्केटचा सोपो कलेक्शन पालिका तिजोरीत शंभर टक्के जमा होत नसल्याने या विषयी मुख्याधिकार्‍यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

मुरगाव नगरपालिका (Mormugao Municipality) गोव्यात "आ" दर्जाची पालिका असल्याची गणना होत असली तरी प्रत्यक्षात पालिका तिजोरीत मात्र गेली कित्येक वर्षे खडखडाट निर्माण झाला आहे. मुरगाव पालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे दळणवळण आहे. यात विमानतळ, मुरगाव पोर्ट, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनी, कोळसा कंपन्या, रेल्वे, झूवारी अॅग्रो कंपनी असे मोठ मोठे उद्योग या ठिकाणी आहेत. वास्को शहर हे एक प्रकारे गोव्याची दुसरी राजधानी म्हटली तर वावगे ठरणार नाही. या सगळ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात महसूल पालिकेला येणे क्रमप्राप्त आहे. मात्र पालिकेचे घोडे कोठे अडतात हे त्यांनाच ठाऊक आहे. या कंपन्यांकडून महसूल गोळा करण्यास पालिका का धजावते? हा मोठा प्रश्न आहे.

कंपन्याकडून करोडो रुपयांची थकबाकी पालिकेला येणे आहे. मात्र त्या कंपन्याकडून थकबाकी रीतसर वसूल होत नसल्याने पालिकेला मोठ्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्याच बरोबर शहरातील आस्थापने, दुकाने तसेच भाजी मार्केट, मासळी मार्केट मधील सोपो कलेक्शन शंभर टक्के गोळा होत नसल्याची सूत्रांकडन माहिती प्राप्त झाली आहे. पालिकेची थकबाकी वसुली होत नसल्याने याचा परिणाम घाण काढण्याचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यावर होत आहे. त्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने याचा सहन करावा लागतो. याला जबाबदार मुख्याधिकारी की नगराध्यक्ष हाच प्रश्‍न भेडसावत आहे. दोन्ही अधिकारी फक्त आश्वासनांच्या फैऱ्या उडवत असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात तारीख पे तारीख देऊन दिवस ढकलत आहे.

दरम्यान वास्को मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांचा शंभर टक्के सोपो कलेक्शन होत नाही अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सोपो घेणारा यात गफला करत असल्याचे बोलले जाते. काही मासे विक्रेत्याकडून पावती न देता पैसे घेत असल्याचे बोलले जाते त्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात मासळी मार्केटमधील सोपा कलेक्शनमध्ये नुकसान सोसावे लागते. याविषयी मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून सोपो गोळा करणाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. ज्याच्यामुळे पालिकेच्या तिजोरीत नुकसानीचा मोबदला तरी जमा होणार. तसेच भाजी मार्केटमध्येही तीच परिस्थिती असल्याचे बोलले जाते. सोपो गोळा करणाऱ्यावर तसेच थकबाकी वसुली करणाऱ्या अधिकारी वर्गावर कडक नजर ठेवल्यास पालिकेची मेटाकुटीस आलेली आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Beti Ferry Boat: 'बेती' फेरीबोट प्रकरणाबाबत धूसरता; सरकारकडे चौकशी अहवाल सादर, पण 'ते' कारण अद्याप गुलदस्त्यात

Goa Politics: विरोधकांमधील फूट पुन्हा उघड! 'त्या' बैठकीवरुन सरदेसाईंचे युरींवर टीकास्त्र

Mandrem News: "मांद्रे पोलिसांना लवकरच 'रॉबर्ट वाहन'; नवीन पोलीस स्थानक इमारतीसाठी 4 हजार चौ.मी. जागेचा प्रस्ताव" आमदार आरोलकर

अनुष्का कुठंय विचारल्यानंतर विराटनं सांगितलं गुपित, 'कपल गोल्स'ची जोरदार चर्चा; Watch Video

Mohammed Siraj: "चल बाहेर!" बेन डकेटला बाद करताच सिराजचा आक्रमक अवतार, दिला धक्का; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT