Rs 2000 currency note Exchange
Rs 2000 currency note Exchange Dainik Gomantak
गोवा

पहिल्याच दिवशी गोव्यात गोंधळ; 2000 ची नोट बदलण्यासाठी कुठे पॅन, आधार तर कुठे अर्जाची भरण्याची मागणी

Pramod Yadav

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) दोन हजार रूपयांच्या नोटा माघारी घेण्याच्या प्रक्रियेला 23 मेपासून सुरूवात झाली आहे. आरबीआयने स्पष्ट केल्यानुसार, नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची किंवा बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही. कोणीही कोणत्याही बँकेत नोटा बदलू शकते.

मात्र, नोटा बदलण्याच्या पहिल्याच दिवशी गोव्यात काही बँकेत 2000 च्या नोटा बदलण्यासाठी पॅन, आधार तर कुठे अर्ज भरण्यासाठी ग्राहकांना सांगण्यात आले.

गोव्यात नोटा बदलण्यासाठी काही बँकांमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळाली. मात्र, नोटा बदलताना काही ठिकाणी ग्राहकांकडे पॅनकार्ड, आधार कार्ड किंवा अर्ज भरण्याची मागणी केली. तर, काही बँकेत लोकांना त्यांची नावे किंवा मोबाईल नंबर देण्यास सांगितले. तसेच, काही लोकांना बँकेत 2000 नोटा जमा करायच्या असतील त्या अकाऊंटमध्ये जमा कारव्यात असे सांगण्यात आले.

दरम्यान, ओळखपत्राची आवश्यकता नाही असे आरबीआयची सूचना असताना देखील बँकेत ओळखपत्राची मागणी केल्याने लोकांमध्ये पहिल्याच दिवशी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच, दोन हजारांच्या नोटा चलनात राहणार असल्याने काहीजण विविध वस्तू विकत घेण्यास प्राधान्य देत आहेत.

दरम्यान, नोटा बदलण्यासाठी बँक खात्याची गरज नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन 2000 च्या 10 नोटा बदलू शकता. RBI ने लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये या नोटा जमा किंवा बदलून घेण्यास सांगितले आहे. बँक तुम्हाला 2000 रुपयांची नोट बदलण्यास किंवा जमा करण्यास नकार देऊ शकत नाही. असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

मात्र, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा जमा करू शकणार नाहीत, त्यांना RBI कार्यालयात जाऊन त्या बदलून घ्याव्या लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : भाजपमधील मोहरे धोक्यात; लोकसभा निवडणूक निकालानंतर ठरणार नेते-पदाधिकाऱ्यांंचे राजकीय भवितव्य

Panaji News : गोवा घडविण्याची प्रक्रिया अजूनही कायम : राजू नायक

Panaji News : चुकीच्या मानसिकतेचा फेणीला फटका; बारचालकांनी प्रचार, प्रसार करणे गरजेचे

Crime News : गरोदर महिलेला मारहाण, पोलिस स्थानकावर धडक; सखोल चौकशी करण्याची महिलांची मागणी

Goa Rain : कडाक्याच्या उष्म्यावर अवकाळी सरींचा गारवा; १५ मे पर्यंत पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT