Agonda Beach Dainik Gomantak
गोवा

Agonda Beach: दोन गटांत फाईट, वातावरण टाईट; आगोंद बीचवरील प्रकार

मारहाणीच्या निषेधार्थ साळेरी ग्रामस्थांचा मोर्चा, 11 फेब्रुवारीपर्यंत कारवाईसाठी अल्टीमेटम

Akshay Nirmale

Agonda Beach South Goa: दक्षिण गोव्यातील आगोंद समुद्र किना-यावर दोन गटामध्ये दोन दिवसांपुर्वी झालेल्या बाचाबाचीनंतर त्याचे रूपांत मोठ्या भांडणात झाले होते. त्यातून दोन्ही गटांत जोरदार मारहाण झाली होती.

दरम्यान, या मारहाणीच्या निषेधार्थ साळेरी ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी आगोंद समुद्रकिनाऱ्यावर मूक मोर्चा काढला.

दोन दिवसांपुर्वी आगोंद बीचवर दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या मारामारीत जखमी झालेल्या मंगलदास धूरी यांना 11 डिसेंबर रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती, त्यांच्या कुटूंबियांनी दिली.

दरम्यान, या हाणामारीचा निषेध करण्याकरिता साळेरी येथील 300 हून अधिक ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी आगोंद समुद्र किनाऱ्यावर मुक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आगोंद पोलीस चौकीवर मोर्चा नेण्यात आला. यातील दोषींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

काणकोण पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी तक्रारदार वासुदेव धुरी यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह चर्चा केली.

यावेळी ग्रामस्थांनी बीचवरील मारामारी प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी लाऊन धरली. 11 फेब्रुवारीपर्यंत दोषींवर कारवाई न केल्यास वेगळ्या पर्यांयांचा विचार करू असा इशारा या शिष्टमंडळाने यावेळी दिला आहे.

या शिष्टमंडळात सुनील पागी, लक्ष्मीकांत पागी, नंदकुमार पागी, महिला व अन्य युवा कार्यकर्त्यांचा भरणा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT