Court Dainik Gomantak
गोवा

Goa Rape Case: बलात्कार प्रकरणी संशयित युसूफ शेखला सशर्त जामीन

बलात्कारप्रकरणी कोठडीत असलेल्या संशयित युसूफ शेख याला उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला.

Shreya Dewalkar

Goa Rape Case: बलात्कारप्रकरणी कोठडीत असलेल्या संशयित युसूफ शेख याला उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला. त्याच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा हा बलात्काराचा असला तरी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तो अमानुष स्‍वरूपाचा असल्याचे सिद्ध होत नाही असे निरीक्षण न्यायालयाने आपल्‍या आदेशात नमूद केले आहे.

न्यायालयाने संशयिताला वैयक्तिक ५० हजार रुपयांची हमी तसेच तत्सम रकमेचा एक हमीदार सादर करण्याची अट घातली आहे. तो राहत असलेला पत्ता तपास अधिकाऱ्यांना द्यावा, पुरावा नष्ट करण्याचा किंवा पीडित तरुणीशी,

साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, तपास अधिकारी किंवा न्यायालय बोलाविल तेव्हा उपस्थित राहावे, पीडित तरुणी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेते किंवा ती राहत आहे तेथे संशयिताने फिरकू नये. त्याने या अटींचे उल्लंघन केले तर जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांना मुभा असेल असे आदेशात स्पष्ट केले आहे.

खोर्ली-म्हापसा येथे राहत असलेल्या ठिकाणी 3 जुलै ते 28 जुलै 2023 यादरम्यान संशयित युसूफ शेख याने वारंवार लैंगिक शोषण केले तसेच अनेकदा विनयभंगही केला, असे तक्रारीत नमूद करण्‍यात आले आहे.

तक्रार केल्यास संशयित जीवे मारण्याची धमकी देत होता. अनेकदा त्याने मारहाणही केली आहे. यानुसार म्हापसा पोलिसांनी विनयभंग, बलात्कार तसेच धमकीप्रकरणी संशयित युसूफ शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

न्‍यायालयाने नोंदविले असे निरीक्षण

संशयिताने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने त्याची सखोल चौकशीची गरज आहे. अजून काही साक्षीदारांच्या साक्ष नोंदवायच्या आहेत. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे. त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी भीती वाटणे आवश्‍यक आहे.

तपासकामावेळी आवश्‍यक पुरावे गोळा करताना संशयित त्यामध्ये अडचणी आणू शकतो, अशी बाजू पोलिसांनी मांडून त्याच्या जामिनाला विरोध केला होता. तर, संशयित न्यायालयीन कोठडीत असल्याने तपासकामाशी त्याचा संबंध येत नाही. त्यामुळे त्याला कोठडीत ठेवून काहीच उपयोग होणार नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्‍याला जामीन मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: गोव्याच्या पर्यटन इतिहासातील काळा दिवस! ‘रोमिओ' लेन ठरली ‘डेथ' लेन

Partgali Math: पर्तगाळ वर्धापनदिन सोहळ्याची सांगता! मान्यवरांची उपस्थिती; विद्याधीश तीर्थ स्वामीजींचे आशीर्वचन

Goa Live News: हडफडे आग दुर्घटना: 'प्लास्टिक सर्जरी' विभागात दाखल 3 रुग्णांची प्रकृती स्थिर; आठवडाभरात मिळणार डिस्चार्ज

Omkar Elephant: केळी, कवाथ्यांची नासधूस! सुपाऱ्यांच्या झाडांचेही नुकसान; ओंकार हत्तीमुळे शेतकरी हैराण Watch Video

Goa Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेबाबत वेगळेच कनेक्शन समोर! युवकाचा झाला होता बुडून मृत्यू; भुताटकी असल्याचा काहींचा दावा

SCROLL FOR NEXT