Court news Dainik Gomantak
गोवा

गुंतवणूकदारांना लुटणाऱ्या मनोजकुमारला सशर्त जामीन

सुमारे 1 हजारांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांना 10 कोटींचा गंडा घातला होता

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यातील गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या कर्मभूमी इन्‍फ्राटेक रिएलिटी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सेनगर याला सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. एक लाखाच्या वैयक्तिक हमीवर तसेच दोन तत्सम रकमेचे दोन हमीदार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आर्थिक गुन्हे कक्षाने त्याला अटक केली होती.

लोकांनी गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट तसेच ठेवीवर 12 टक्के व्याजाचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशच्या कर्मभूमी इन्फ्राटेक रिएलिटी कंपनीने गोव्यातील सुमारे १ हजारांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांना १० कोटींचा गंडा घातला.

याप्रकरणी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सेनगरला मथुरा -उत्तर प्रदेश येथील तुरुंगातून बदली वॉरंटवर गोव्यात आणून अटक केली होती.

न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ती संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती. त्यामुळे त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. संशयिताचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी बाजू पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी मांडली होती.

व्याजाच्या आमिषाने गुंतवणूक

  • उत्तर प्रदेशातील कर्मभूमी इन्फ्राटेक रिएलिटी कंपनीने २०१३ मध्ये फोंडा, म्हापशात शाखा सुरू केल्या होत्या.

  • कंपनीने पाच वर्षांसाठी ठेव रक्कम दुप्पट आणि वर्षासाठी ठेवीवर १२ टक्क्यांनी व्याज देण्याचे आमिष दाखवले होते.

  • लोकांनी भरमसाट व्याजाच्या अमिषाने कंपनीत ७ कोटी रुपये गुंतवले होते. व्याजासह ही रक्कम १० कोटींवर पोहचली होती.

  • गुंतवणूकदारांनी पाच वर्षांनी ठेव रक्कमेची व्याजासह परताव्याची मागणी केल्यावर कंपनी व्यवस्थापनाने गोव्यातून पळ काढला.

  • फसवणूक झाल्याने काहींनी आर्थिक गुन्हे कक्षाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Rescued: घनदाट जंगलात गुहेत आढळली रशियन महिला! गोवामार्गे पोचली गोकर्ण येथे; कारण ऐकून पोलीस झाले थक्क

Goa Farmers: ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! प्रतिहेक्टर अर्थसाहाय्य योजना होणार बंद; यंदापासून प्रतिमेट्रीकनुसार भाव

Rashi Bhavishya 13 July 2025: आर्थिक व्यवहारात फायदा, नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

Paliem: पूर्वजांनी नवदुर्गेचे नाव घेत, कष्टाने निर्माण केलेला पाचूचा 'पाळी' गाव

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

SCROLL FOR NEXT