Kala Academy in Panjim  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कला अकादमीची दुरावस्था हे सरकारचे तीव्र अपयश! सेसिल यांचे मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र

Kala Rakhonn Mannd: कला अकादमीत निकृष्ट, डुप्लीकेट उपकरणे बसवण्यास उपकंत्राटदार जबाबदार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy Problems

पणजी: कला अकादमीच्या प्रवर कला राखण मांडने पुन्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. २ जुलै रोजीच्या पत्रात उपस्थित केलेल्या मुद्यांवर काही उपाय काढण्यात आला नसून कला अकादमीची स्थिती आणखी गंभीर बनल्याचे मांडच्या सरचिटणीस सेसिल रॉड्रिग्ज यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की राज्यातील कलाकारांच्यावतीने हे पत्र लिहीण्यात आले आहे. कला अकादमी संकुल पूर्ववत करण्याबाबत काही मुद्दे यापूर्वी उपस्थित करण्यात आले होते. ते सोडवण्याचे आश्वासन देऊनही परिस्थिती जैसे थे राहण्याऐवजी आणखीन बिघडली आहे. विधानसभेत या प्रश्नी सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.

मात्र, प्रत्यक्षात त्याची पूर्ती करण्यात आलेली नाही. कला अकादमी निकृष्ट बांधकाम, सदोष ध्वनीशास्त्र, अयोग्य पद्धतीने आवाज कमी करणे, निकृष्ट प्रकाश उपकरणे अशा समस्यांनी घेरली गेली आहे. हे प्रश्‍न सोडवणे अपेक्षित असताना त्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. मोठा निधी खर्चूनही हे प्रश्‍न न सोडवले जाणे हे सरकारचे तीव्र अपयश आहे,असेही सेसिल यांनी पत्रात म्हटले आहे.

आणखी २ कोटी खर्चू नका!

ध्वनी व प्रकाश योजनेच्या उपकरणांवर २ कोटी रुपये आणखीन खर्च केले जाऊ नयेत. यासाठी नवा सल्लागार नेमला जाऊ नये. कला अकादमीत निकृष्ट, डुप्लीकेट उपकरणे बसवण्यास उपकंत्राटदार जबाबदार आहे,असे नमूद करून सेसिल रॉड्रिग्ज यांनी पत्रात म्हटले आहे, की विधानसभेत आश्वासन दिल्याप्रमाणे मांडच्या सदस्यांसह कलाकार आणि चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनचे सदस्य यांचा समावेश असलेली समिती कला अकादमीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केली जावी. याप्रश्नी चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT