Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापसा बाजारपेठेतील मार्केटच्या छताची दुरवस्था! काँक्रिट उखडले, तत्काळ दुरुस्तीची गरज

Mapusa Market: म्हापसा पालिका बाजारपेठेमधील पॅसेज भागातील छताच्या काँक्रिटचे काही तुकडे उखडून पडले. मंगळवारी घडलेल्या या घटनेत, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

Sameer Amunekar

म्हापसा: म्हापसा पालिका बाजारपेठेमधील पॅसेज भागातील छताच्या काँक्रिटचे काही तुकडे उखडून पडले. मंगळवारी घडलेल्या या घटनेत, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

यासंदर्भात म्हापसा पालिका मार्केट कमिटीचे अध्यक्ष साईनाथ राऊळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बाजारपेठेची इमारत सुमारे ६० वर्षे जुनी असून दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे.

पालिका अभियंत्यांनी बाजाराच्या संरचनेच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे; कारण आम्हाला व्यापार परवाना, भाडे या स्वरूपात बाजारातून महसूल मिळतो.

म्हापसा पालिका मार्केट हे पोर्तुगीज काळात बांधले होते. त्या काळातील ते नियोजित बाजारपेठ म्हणून ओळखले जायचे. मात्र, सध्या या संरचनेकडे दुर्लक्ष केल्याने, अशा घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान, काही दुकानदारांनी त्यांच्या संबंधित भागात स्वतःहून दुरुस्ती केली आहे.

सर्वात जास्त प्रभावित भाग म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाजूचा परिसर आहे. येथील सिलिंगचे काँक्रिट कमकुवत झाल्याने, वारंवार हे सिमेंटचे तुकडे अधिकतर पावसाळ्यात कोसळत आहेत.

डागडुजी आवश्यक!

म्हापसा व्यापारी संघटनेचे सचिव सिद्धेश राऊत म्हणाले की, म्हापसा बाजारपेठ ही जुनी संरचना आहे. ज्याची तातडीने डागडुजी करणे आवश्यक आहे. सध्या पालिकेने या संरचनेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे काँक्रिटचे तुकडे पडण्याच्या घटना घडत आहेत. ज्यामुळे पर्यटक, विक्रेते आणि व्यापाऱ्यांसह सर्वांसाठी धोका निर्माण होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, मलेशियाचा 4-1 नं केला पराभव

Dharbandora Accident: धारबांदोड्यात दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जखमी

GST 2.0: दूध, औषधं, शालेय साहित्य, विमा... 'या' सेवा आणि वस्तूंवर आता 0% जीएसटी, पाहा संपूर्ण यादी

BITS Pilani: नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू; बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी

ODI World Cup 2025: एकदिवसीय विश्वचषक तोंडावर असताना टीम इंडियाला तगडा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

SCROLL FOR NEXT