Sonsodo Wall Collasped Dainik Gomantak
गोवा

सोनसोडो कचरा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज

दररोज मडगावात 38 हजार किलोग्राम ओला व 20 हजार किलोग्राम सुका कचरा एकत्रीत होत असतो.

दैनिक गोमन्तक


सासष्टी: सोनसोडो कचरा प्रश्न दिवसेनदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. हल्लीच तेथील भिंतीचा भाग कोसळल्या मुळे मडगाव नगरपालिका कामाला लागली आहे. मुख्याधिकारी रोहीत कदम यांनी पुढाकार घेऊन अनेक उपाययोजना करण्याचा घाट घातला आहे.
(concrete measures to solve Sonsodo waste problem in margao)

सर्वप्रथम सोनसोडो येथे पुर्वी एकत्रीत झालेला व दररोज तेथे टाकण्यात येणारा कचरा असे दोन भाग आहेत. दररोजच्या कचऱ्याची प्रक्रिया होत नाही तर पुर्वी एकत्रीत झालेला कचला हळू हळू कंत्राटतदार उचलुन नेत असल्याचे कदम यानी पत्रकारांना सांगितले. दररोज मडगावात 38 हजार किलोग्राम ओला व 20 हजार किलोग्राम सुका कचरा एकत्रीत होत असतो. आम्ही या संदर्भात साळगाव येथील गोवा कचरा व्यवस्थापन कोर्पोरेशनला लिहून मडगाव मधील दररोजच्या 40 हजार किग्रा कचऱ्याची प्रक्रिया करावी अशी विनंती केली आहे. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पहात असल्याचे कदम यानी सांगितले.


सर्वप्रथम आम्हाला 5 हजार चौरस मीटर एवढी मोठी कचरा शेड स्वच्छ करायची आहे. तेथे टाकलेला कचरा प्रथम उचलायला पाहिजे. नंतर या शेडचे दुरुस्ती काम हातात घेतले जाईल. त्या साठी सरकारकडे 3.82 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. भिंत दुरुस्तीचा त्यात समावेश नसल्याने त्यासाठी वेगळा प्रस्ताव तयार करावा लागेल असेही मुख्याधिकारी कदम यानी सांगितले.

शेड मध्ये टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याने शेड मोडण्याची शक्यता कदम यांनी व्यक्त केली. त्या ठिकाणी टाकलेल्या ओल्या कचऱ्याचे पाणी झिरपुन शेड कमजोर बनली आहे असेही कदम यानी स्पष्ट केले.
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने हल्लीच सोनसोडो कचरा प्रकल्पाला भेट दिली व पाहणीनंतर त्यानी अनेक सुचना केल्या. त्यात शेडच्या दुरुस्तीचा समावेश असल्याचेही कदम यानी सांगितले.
कचरा व्यवस्थापन मंत्री आतान्सियो मोन्सेरात यांनी हल्लीच सोनसोडो भेटीच्या वेळी 25
टीडीपी बायो डायजेस्टरची व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले होते. त्या अनुषंगाने गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने या बायो डायजेस्टरची व्यवस्था होई पर्यंत दररोजच्या कचऱ्याची प्रक्रिया करण्याचा एक प्रस्ताव तयार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT