computer Gomantak Digital Team
गोवा

Digital India : होंडा तलाठी कार्यालयातील संगणक नादुरूस्त

जनतेचा खोळंबा : ८ महिने संगणकाविना; ‘डिजिटल इंडिया’ चा बोजवारा

गोमन्तक डिजिटल टीम

पिसुर्ले : सरकारने ‘डिजिटल इंडिया ’चा नारा दिला असून जनतेच्या सोयीसाठी विविध योजना ऑनलाईन करण्याचा चंग बांधला आहे. परंतु सदर योजनेच्या त्यासाठी लागणाऱ्या साधन सुविधा मात्र, उपलब्ध करून देत नसल्याने सर्व सामान्य जनतेला याचा लाभ होताना दिसत नाही.

याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे होंडा पंचायत क्षेत्रातील तलाठी कार्यालयातील संगणक गेली आठ महिने नादुरुस्त आहेत. नवीन संगणक देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे सर्वसामान्यांची कामे रखडली असून ग्रामस्थांना महत्वाची कामे उरकण्यासाठी खासगी एजन्सीकडे धाव घ्यावी लागत आहे.

होंडा पंचायत क्षेत्रातील जनतेची विविध कामे ऑनलाईन पद्धतीने मार्गी लावण्यासाठी सरकारने तलाठी कार्यालयात काही वर्षांपासून संगणक उपलब्ध केले होते. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना तलाठी कार्यालयातून मोफत विविध स्वरूपाचे दाखले उपलब्ध होत होते. यामुळे वेळ व पैसा याची बचत होऊन लोकांना याचा बराच फायदा होत होता.

परंतु गेल्या आठ महिन्यांपासून या कार्यालयातील संगणक यंत्रणा नादुरूस्त झाल्याने येथील कार्यालयातून कोणतेही दाखले किंवा इतर सुविधा उपलब्ध होत नाहीत. या भागातील ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सोसून खाजगी संस्थेकडून कामे करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. तलाठ्यांना कार्यालयीन कामसाठी आठवड्यातून एकदा वाळपई मामलेदार कार्यालयात जावे लागत आहे.

अहवाल वरिष्ठांकडे पण; कारवाईच नाही!

होंडा तलाठी कार्यालयातील संगणक यंत्रणा पंचायत निवडणूक झाल्यापासून नादुरूस्त झाली आहे, या विषयीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.या संबंधी पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी लक्ष घालून येथे संगणकाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होंडा भागातील रहिवाशांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT