Technology : भारतात सार्वजनिक वाहतुकीत 'अशा प्रकारे' होतेय क्रांती, वाचा..

विद्युत घटांवर चालणाऱ्या बस गाड्या आता सर्वच महापालिका क्षेत्रात दाखल होत आहेत.
Technology
TechnologyDainik Gomantak

Technology News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आवाहन केल्यानुसार पर्यावरण पूरक बॅटरी किंवा विद्युत घटांवर चालणाऱ्या बस गाड्या आता सर्वच महापालिका क्षेत्रात दाखल होत आहेत.

त्यामुळे लवकरच सार्वजनिक वाहतुकीत मोठी क्रांती घडवणार आहेत. महत्वाचे म्हणजे यामुळे देशाचे कार्बन इंधन आयात करण्यासाठी लागणारे बहुमुल्य परकिय चलन वाचणार आहे.

पारंपारिक सार्वजनिक वाहतुकीला संपुर्ण कार्बनमुक्त पर्याय म्हणजे हायड्रोजन बस आहेत. या उपक्रमामुळे भारत सरकारच्या कार्बनमुक्त हायड्रोजन इंधनाच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेला बळ मिळणार आहे. जुन्या डिझेल आणि पेट्रोल वर चालणाऱ्या बसेस टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक बसेसमध्ये परावर्तित करण्याच्या केंद्र सरकारच्या महात्वाकांक्षी योजनेला यामूळे चालना मिळेल.

Technology
Vande Bharat Express: अश्विनी वैष्णव देणार मोठी भेट, लवकरच 'या' मार्गावर धावणार वंदे भारत!

12-मीटरच्या लो-फ्लोअर बसमध्ये प्रवाशांसाठी 32 पासून 49 आसनाची सोय असणार आहे. या व्यतिरिक्त एक ड्रायव्हरचे आसन अशी आसन क्षमता असेल. एकदा  हायड्रोजनची टाकी फुल्ल केल्यानंतर बस 400 किमी पर्यंत प्रवास करू शकेल अशी माहितीही मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com