Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Goa Construction Projects: राज्यातील रेंगाळलेले बांधकाम प्रकल्प लवकर पूर्ण करा : काब्राल

काब्राल यांनी सांगितले, की राज्यात अनेक प्रकल्प मागे पडलेले आहेत. ते प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख केव्हाच उलटून गेली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात गेली १०-१५ वर्षे रेंगाळलेले बांधकाम प्रकल्प पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेच पाहिजेत, अशी तंबी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बुधवारी (ता.३०) दिली.

त्यांनी मंत्रालयात रात्री ९.३० वाजेपर्यंत आपल्या खात्याशी संबंधित आढावा बैठका घेतल्या. या बैठकांनंतर त्यांनी ‘दै. गोमन्तक’ला या बैठकांतील निर्णयांविषयी माहिती दिली.

काब्राल यांनी सांगितले, की राज्यात अनेक प्रकल्प मागे पडलेले आहेत. ते प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख केव्हाच उलटून गेली आहे. कंत्राटदार आणि खाते या दोन्ही पातळ्यांवर प्रकल्प पूर्ण करण्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.

त्यामुळे सरकारी प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत, असा चुकीचा समज जनतेत पसरला आहे. काही प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने ज्या कारणासाठी तो प्रकल्प उभारण्यात येत होता ते कारणच आता राहिले नाही, असेही झाले आहे.

या साऱ्याचा आढावा घेऊन असे मागे पडलेले प्रकल्प पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT