Sexual Harassment Case in Fatorpa Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Sexual Harassment Case: फातर्पा येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित व्यक्तीच्या नावे गुन्हा दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केपे येथील फातर्पा येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कुंकळी पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या नावे गुन्हा दाखल केला आहे.

संशयित आरोपी हा फिर्यादीचा भाऊ असून त्याने स्वतःच्या भावाच्या खोलीत घुसून त्याच्या होणाऱ्या बायकोला शिवीगाळ केली असल्याचा गुन्हा दाखल नोंदवण्यात आला.

संशयित आरोपीने त्याची पॅन्ट खाली खेचली आणि अश्लील हावभाव करत पीडित महिलेच्या विनयशीलतेला ठेस पोहोचवली.

एवढेच नाही तर आरोपीने त्याचा भाऊ आणि त्याच्या होणाऱ्या बायकोवर दगडफेक करत त्यांना इजा पोहोचवण्याची धमकी दिली. सदर घटनेची तक्रार पोलिसांकडे नोंदवली गेली असून पीएसआय किशोर वेळीप याचा पुढील तपास करीत आहेत.

सायपे येथे शाळकरी मुलीचा विनयभंग

काही दिवसांपूर्वी सायपे येथून शाळकरी मुलीच्या विनयभंगाची घटना समोर आली होती. सायपे, मार्रा-पिळर्ण येथे 10 वर्षी़य शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जालम रामदयाळ महोर (वय 52 वर्षे, मूळ मध्य प्रदेश) या सुरक्षा रक्षकाला पर्वरी पोलिसांनी अटक केली होती.

पीडित मुलगी संशयित नोकरी करत असलेल्या व्हिलामधील केअरटेकरची मुलगी आहे. ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली होती.

संशयिताने मुलीला आपल्याकडे बोलावले आणि तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार गुरुवारी पीडितेने आई-वडिलांच्या कानी घातला होता. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार नोंदवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT