Bicholim Police  Dainik Gomantak
गोवा

Menkurem Crime: 'मेणकुरे'त तलाठी मारहाणप्रकरणी वाद चिघळला! परस्परविरोधी तक्रार दाखल

Bicholim Menkurem: डिचोली तालुक्यातील मेणकुरे येथील तलाठी मारहाण प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून, प्रकरणातील गुंता वाढला आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या तलाठ्याने मेणकुरे येथील दोन भावांविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Menkurem Talathi Assault Case

डिचोली: डिचोली तालुक्यातील मेणकुरे येथील तलाठी मारहाण प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून, प्रकरणातील गुंता वाढला आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या तलाठ्याने मेणकुरे येथील दोन भावांविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. तर संबंधित तलाठ्याने अन्य एका व्यक्तीच्या मदतीने बेकायदेशीरपणे मालमत्तेत घुसून एका महिलेला मारहाण केल्याची परस्परविरोधी तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.

सरकारी सेवा बजावताना शिवीगाळ करून नंतर मला मारहाण करण्यात आली आहे, अशी तक्रार मेणकुरे-धुमासे पंचायतीचे तलाठी फटगो पालकर (४७, हरवळे) यांनी मेणकुरे येथील संजय विष्णू नाईक आणि अशोक विष्णू नाईक यांच्याविरोधात पोलिसांत केली आहे. एका तक्रारीला अनुसरून मेणकुरे येथील सर्व्हे नं-८९/१, ३९/१४ आणि ३९/१३ मालमत्तेची पाहणी करताना नाईक बंधूंनी अचानक मला मारहाण केली, असेही फटगो पालकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूने तलाठी आणि अमर अनंत नाईक यांनी एका नातेवाईक महिलेसह मला आणि भावाला मारहाण केली, अशी तक्रार अशोक विष्णू नाईक यांनी पोलिसांत केली आहे. तलाठी पालकर आणि अमर नाईक यांनी आमच्या मालमत्तेत बेकायदेशीरपणे शिरकाव केला, असा दावाही अशोक नाईक यांनी केला आहे. दरम्यान, आता पोलिस याप्रकरणी कोणत्या पद्धतीने तपास करतात ते पाहावे लागेल.

पोलिसांनी नोंदवली तक्रारदारांची जबानी

दोन्ही तक्रारींची तक्रारदारांची जबानी दखल घेत पोलिसांनी दोन्ही तक्रारदारांची जबानी नोंदवून घेतली आहे. डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT