मडकई: श्री नवदुर्गा संस्थान मडकई येथे मूर्ती आणि मंदिराचा वाद सुरु आहे. सोमवारी (दि. ९ डिसेंबर) रोजी सकाळी मंदिरातील पुजाऱ्याला मारहाण केल्याची बातमी समोर आली होती. मंदिरातील पुजारी आणि ग्रामस्थ एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार मडकई नवदुर्गा मंदिरात स्थानिक महिलांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी महिलांकडून म्हार्दोळ पोलिस स्थानकात तीन भटजींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महिलांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी मंदिरात झालेल्या वादात भटजींकडून महिलांना धक्काबुक्की करण्यात आली होती. देवस्थानातील भटजी नवदुर्गेचं मंदिर हे त्यांचं आणि महाजनांचं असल्याचा दावा करतायत, आणि स्थानिक गावकऱ्यांचा त्या देवालयात काहीही अधिकार नाही असं सांगितलं जातंय.
सिधुराज घैसास ,आदित्य घैसास आणि श्रीदत्त घैसास अशी या पुजाऱ्यांची नावं आहेत. मंदिरात पुजाऱ्याला मारहाण केली गेल्याची बातमी सगळीकडे धुमाकुळ घालत असताना हा पुजारी नेमका आहे तरी कोण हेच माहिती नसल्याचं विधान महिलांनी केलंय.
मंदिरात कार्यरत असणाऱ्या पुरोहिताशिवाय आणखीन कुणालाही ओळखत नसल्याचं महिला म्हणाल्यात. केवळ मंदिराच्या संपत्तीवर डोळा असल्यास गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही प्रयत्न केलेच नसते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.