Maina Curtorim Crime Dainik Gomantak
गोवा

चाकूचा धाक दाखवत तरुणाला धमकावलं

राय भागातील घटना, मायणा कुडतरी पोलिसांकडून तक्रार दाखल

दैनिक गोमन्तक

मडगाव : चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. मायणा पोलिसांकडे चाकू हल्ला केल्याची वर्दी देण्यात आली होती. यानंतर रविवारी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केला आहे.

मायणा कुडतरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी आरोपीने चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीला धमकावल्याची प्राथमिक माहिती आहे. राय भागात शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. रुपेश नाईक नावाच्या तरुणाने सेबी फेराव याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सेबी याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याची माहिती आहे.

शनिवारी झालेल्या या घटनेनंतर पीडिताच्या फीर्यादीवरुन पोलिसांनी (Police) रविवारी तक्रार दाखल केली आहे. पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने विनाकारण आपल्याला त्रास दिला आणि जवळील चाकूचा धाक दाखवत धमकावल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यानंतर लोक जमा होत असल्याचं पाहून घटनास्थळावरुन पोबारा केला, असंही तक्रारीत नोंद आहे. या धमकावण्यामागचा आरोपीचा उद्देश काय होता याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. मायणा कुडतरी पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT