Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News : सभापती रमेश तवडकरांच्‍या विरोधात उपवनपालांकडे तक्रार

तवडकर व अन्‍य अधिकाऱ्यांविरोधात गुन्‍हा नोंद कराण्याची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

काणकोण येथे जी बेकायदेशीर वृक्षतोड झाली आहे, त्‍यात सभापती रमेश तवडकर यांचा हात असून त्‍यात वन खात्‍याचे अधिकारीही सामील आहेत, अशा आशयाची तक्रार काँग्रेस नेते जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्ड नेते विकास भगत यांनी दक्षिण गोवा उप वनपालाकडे केली असून या प्रकरणी तवडकर व अन्‍य अधिकाऱ्यांविरोधात गुन्‍हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.

लोलये येथील शासकीय सुतारकाम केंद्रातील कथित बेकायदा लाकूड वाहनात भरून आज स्थलांतरित करण्यात आले. हे लाकूड बेकायदा असल्याचा पर्दाफाश बुधवारी काँग्रेसचे जनार्दन भंडारी व गोवा फॉर्वर्डचे विकास भगत यांनी केला होता.

त्यानंतर हे लाकूड बेकायदा नसून ते 18 एप्रिलला वनखात्याकडून लिलाव पद्धतीने विकत घेण्यात आले आहे. त्यासंदर्भात गावडोंगरी येथील अशोक वेळीप यांच्या नावे 24 एप्रिलला वन अधिकाऱ्यांच्या सहीनिशी काढलेली 38500 व 963 रुपयांची पोच पावती प्रसारमाध्यमांना सभापती रमेश तवडकर यांनी दिली होती. जे लाकूड कायदेशीर असून ते शासकीय सुतारकाम केंद्रात कापण्यात आले त्याची वाहतूक करण्यास परवानगी दिल्याचे वनखात्याच्या अधिकाऱ्यानी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran War: ''युरेनियम कोणालाही सोपवणार नाही'', इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; ट्रम्पच्या दाव्याला सुरुंग

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

Crime News: प्रेम, वाद अन् क्रूर हत्या! हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आली अन् काळ बनून परतली; काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

SCROLL FOR NEXT