Ministar Nilkanth Halarnkar  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : काकरा येथील होड्या जळितग्रस्तांना योग्य तीच भरपाई दिली - नीळकंठ हळर्णकर

होड्यांचे नुकसान नैसर्गिकदृष्‍ट्या झालेले नसतानाही भरपाई देण्यात आल्याचे स्पष्टीकरण मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : काकरा येथील होड्यांना आग लागून त्या खाक झाल्या होत्या. भरपाईसाठी होडी मालकांनी केलेल्या अर्जावर योग्य निर्णय घेऊन भरपाई देण्यात आली आहे. कोणावरही अन्याय केलेला नाही. या होड्यांना पूर्ववैमनस्यातून आगी लावण्यात आल्या होत्या. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. या होड्यांचे नुकसान नैसर्गिकदृष्‍ट्या झालेले नसतानाही भरपाई देण्यात आल्याचे स्पष्टीकरण मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केले.

काही दिवसांपूर्वी काकरा येथील पारंपरिक होडी मालकांनी मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भरपाईच्या रकमेत घट झाल्याबाबत विचारणा केली होती. कॉर्पस निधीतून ही भरपाई देता येते, मात्र ती देण्यात दिरंगाई सुरू आहे, असे आरोप केले होते. त्यावर मंत्री हळर्णकर म्हणाले की, एखाद्या मच्छिमाराच्या होडीचे किंवा बोटीचे नैसर्गिक नुकसान झाले असेल तर त्याचा विचार भरपाईसाठी होतो.

या भरपाईसंदर्भात निर्णय मंत्री किंवा खात्याचे संचालक घेत नाहीत, तर त्यासाठीची नियुक्त समिती घेत असते. त्यामुळे भरपाई किती द्यावी, याच्याशी मंत्री किंवा संचालकांचा काहीही संबंध नाही. कोणावरही अन्याय झालेला नाही.खात्याकडे तीन अर्ज आले होते, त्यापैकी दोघांना भरपाईस मंजुरी दिली गेली आहे. ही भरपाई झालेल्या नुकसानीच्या आधारावर व कोणत्या प्रकारे झाली आहे, यावरून दिली गेली आहे,असेही हळर्णकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू अखेर पोलिसांच्या ताब्यात! मोपा विमानतळावरून थेट वैद्यकीय तपासणीसाठी

SCROLL FOR NEXT