Madgaon Margao Anti-encroachment Drive
मडगाव: मडगाव शहराच्या काही भागांमध्ये असलेल्या कोमुनिदाद जागेवरील अतिक्रमणे बुधवारी (दि. १२ फेब्रुवारी) रोजी तब्बल वीस वर्षांनंतर हटवण्यात आली. प्रशासनाने याची दक्षता घेतल्याने दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकाच्या उपस्थितीत ही अतिक्रमणे हटवण्यात आली. वर्ष २०१७ मधेच अशी अतिक्रमणे हटवण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र काही कारणास्तव ही प्रक्रिया रखडली होती.
दक्षिण गोव्यात मडगावहून कोलवा येथे जाताना अनेक कोमुनिदाद जमिनींवर केलेली अतिक्रमणे पाहायला मिळतात. गेल्या अनेक वर्षांत या जमिनींवर बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली, ज्यांची संख्या आता तीसच्या जवळ जाऊन पोहोचली आहे.
यात काही हॉटेल्स, फर्निचरची दुकानं, भंगार अड्डे इत्यादींचा समावेश आहे. मडगाव कोमुनिदाद विभागाकडून वर्ष २०१५ मध्ये या प्रकरणांची दाखल घेण्यात आली होती आणि ही अतिक्रमणे हटवावी असा आदेश देखील वर्ष २०१७ मध्ये जारी करण्यात आला होता, मात्र काही कारणास्तव ही प्रक्रिया पुढील अनेक वर्षांसाठी रखडली.
बुधवारी (दि. १२ फेब्रुवारी) रोजी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आणि दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक गणेश बर्वे यांच्या नेतृत्वाखाली ही बेकायदेशीर बांधकामे हटवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. वर्ष २०१७ मध्ये ही बांधकामे पडणार होती मत या आदेशाला आव्हान दिल्याने ती कारवाई स्थगित झाली होती, मात्र आता सर्व प्रकारची बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात येतील अशी माहिती गणेश बर्वे यांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.