Minister Purushottam Rupala Dainik Gomantak
गोवा

Goa Fisherman: मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध; केंद्रीय मंत्री रुपाला यांचे प्रतिपादन

खारीवाडा-वास्को परिसरातील मच्छीमार जेटीची पाहणी

दैनिक गोमन्तक

देशातील मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मस्त्य व्यवसायासंबंधी स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. त्यामुळे देशातील समुद्रात मासळीचा व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बंधूंना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. खोल समुद्रात वादळी वाऱ्याशी संघर्ष करून व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी, केंद्र व राज्य सरकार समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री मत्स्यपालन मंत्री परशोत्तम रूपाला यांनी केले.

मंत्री रुपाला यांनी वास्को खारीवाडा मच्छिमारी जेटीवर जाऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा व इतर मच्छीमार व्यावसायिक उपस्थित होते.

आमदार संकल्प आमोणकर यांनी मच्छीमारांना त्यांची घरे पाडण्याच्या सततच्या धमक्यांबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी मुरगाव बंदर प्राधिकरणाशी बोलण्याचे आश्वासन दिले. संकल्प आमोणकर यांनीही मच्छिमारांच्या विविध समस्या मांडल्या, रुपाला यांनी कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन दिले.

देस्तेरो-वास्को येथे ‘सागर परिक्रमा-२०२३’ (पाचवा टप्पा) मच्छीमार व्यावसायिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी गोवा सरकारच्या मस्त्यव्यवसाय संचालनालयातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मस्त्यव्यवसाय मंत्री परशुत्तम रुपाला, मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार कृष्णा साळकर, संचालक डॉ. शर्मिला मोन्तेरो व इतर मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र किनारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी पंतप्रधान मोदी यांनी मस्त्यव्यवसायाला स्वतंत्र विभाग घोषित करून येथील मासळी व्यवसाय करणाऱ्या बांधवांना न्याय मिळवून दिला आहे. केंद्र व राज्य सरकार समुद्र किनाऱ्यावरील मस्त्यव्यवसाय करणाऱ्यांची समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी दिले.

रापणकार संघटनेचे नेते ओलेसियो सिमाईश, वास्को मासळी मार्केटच्या सदस्य श्रीमती रुसलीन डिसोझा, ख्रिस्तोद डिसोझा, शौकत हवेरी, साजिद शेख, कामिल डायस, पेले फर्नांडिस यांनी समस्या मांडून मंत्र्यांना निवेदन सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT