Goa Krishi Mahotsav: शेतकरी कृषी विधेयकासोबत; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास

कुर्टी-फोंड्यात ‘कृषी महोत्सव २०२३’चे उद्‌घाटन
Goa Krishi Mahotsav
Goa Krishi MahotsavDainik Gomantak

Goa Krishi Mahotsav: पैशांच्या मोहापायी राज्यातील जमिनी विकण्याचा सपाटा चालला असून शेतजमीनही या विक्रीतून सुटलेली नाही. म्हणूनच गोव्यातील शेतजमिनी अबाधित राहाव्यात यासाठी सरकारने कृषी विधेयक आणले असून त्याला शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

Goa Krishi Mahotsav
तुमच्या खोक्यात 2,000 च्या नोटा आहेत का चेक करा; पणजीकरांनी बंडखोर आमदारांवर साधला निशाना

कुर्टी-फोंड्यात आयोजित कृषी महोत्सव २०२३ च्या उद्‌घाटन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषीमंत्री रवी नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, कुर्टी-खांडेपार सरपंच संजना नाईक व कृषी खात्याचे संचालक नेव्हील आफोन्सो आदी उपस्थित होते.

गोवा कृषी उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी सरकार कार्यरत आहे. शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी प्रोत्साहन देतानाच विविध योजनांखाली पन्नास ते शंभर टक्के अनुदान दिले जात आहे. त्याचा लाभ गोमंतकीय शेतकऱ्यांनी घेतला तर आम्हाला भाजीपाला आणि इतर वस्तूंसाठी दुसऱ्या राज्यांवर निर्भर राहण्याची काहीच गरज उरणार नाही. आजच्या युवकांनी शेती कसली तर ते शक्य आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविक नेव्हील आफोन्सो यांनी केले. या कृषी महोत्सवात कृषीविषयक अवजारे तसेच इतर साहित्य आणि कृषी उत्पादनांची भरपूर रेलचेल असून शेतकरी व इतर लोकांकडून प्रदर्शनासाठी गर्दी होत आहे.

कृषी विधेयकाला काहीजण विरोध करीत आहेत, त्यांना गोव्यातील जमिनी विकायच्या आहेत; पण गोव्यातील शेतजमिनी अबाधित राहाव्यात, या जमिनी लागवडीखाली आणाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असून कृषी विधेयक हा त्याचाच एक भाग आहे. विशेषतः किनारपट्टी भागात पैशांसाठी जमिनी विकल्या जात आहेत, हा प्रकार बंद व्हावा यासाठीच सरकारकडून ही कार्यवाही होत आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

शेती राखून ठेवण्याची आज गरज आहे. कृषी धनातून स्वयंपूर्ण गोवा साकारताना शेतकऱ्यांनाही त्याचा पुरेपूर लाभ व्हावा यासाठी सरकारने विशेषतः कृषी खात्याने अनेक योजना आणि उपक्रम आखले आहेत, त्यांचा लाभ घ्यावा. पडिक शेती लागवडीखाली आली तरच अशाप्रकारची क्रांती होऊ शकते. - रवी नाईक, कृषीमंत्री

लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात!

कृषी क्षेत्राशी निगडित विविध योजना आणि उपक्रमांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सरकार कार्यरत आहे. शेतकऱ्यांना मागच्या काळात अनुदान मिळेपर्यंत बराच काळ जायचा, पण आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते या कृषी महोत्सवात झाला.

गोव्यात शेतजमिनी जर लागवडीखाली आल्या तर कृषीधन वाढेल. मुळात मांडवी व झुआरी नदीकाठच्या परिसरात बांध उभारले तर शेतजमिनी अबाधित राहू शकतात. राज्यात पहिल्यांदाच अशाप्रकारचा भव्य कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला असून कृषीमंत्री रवी नाईक यांच्या संकल्पनेमुळे हे शक्य झाले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com