Dengue Day Program Dainik Gomantak
गोवा

डेंग्यूच्या निर्मूलनासाठी एकत्र या: डॉ. राजेश नाईक

मडगाव नागरी आरोग्य केंद्रात राष्ट्रीय डेंग्यू दिवस

दैनिक गोमन्तक

सासष्टी: डेंग्यू हा पुरातन काळापासूनचा रोग आहे. मात्र आता या रोगाला दूर ठेवण्यासाठी अनेक उपाय व औषधे उपलब्ध आहेत. डेंग्यूच्या निर्मूलनासाठी सर्वांना आपापसातील राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक मतभेद विसरुन एकत्र काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेश नाईक यांनी केले. मडगावच्या नागरी आरोग्यकेंद्राने राज्यस्तरावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय डेंग्यूदिनानिमित्त सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

डेंग्यू व इतर रोगांच्या निर्मूलनासाठी नगरपालिकेला जास्त निधी उपलब्ध करुन द्यावा. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणच्या कंत्राटदारांना व मजुरांना आरोग्यकार्ड देऊन त्यांची नोंदणी करावी अशी सूचना ‘गोवा कॅन’चे निमंत्रक रोलांड मार्टिन्स यांनी केली आहे. यावेळी संचालक डॉ. आयरा आल्मेदा, डॉ. दीपा कुरैया, डॉ. सुकोर क्वाद्रोस, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, नगरसेवक सदानंद नाईक, बबिता नाईक, पूजा नाईक, कामिल बार्रेटो, मिलाग्रिना गोम्स, फ्रान्‍सिस जुझे, सुनीता पराडकर, श्‍‍वेता लोटलीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळा, पंचायत पातळीवर जागृती अभियान : डॉ. कल्पना महात्मे

पावसाळ्यात होणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. डेंग्‍यू रोगाबाबत जागृती करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, संस्था, पंचायती, नगरपालिका परिसरात जागृती मोहीम हाती घेतल्याचे त्‍यांनी सांगितले. नगरपालिकेने मान्‍सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. एप्रिल 2022 पर्यंत गोव्यात 1352 संशयित रुग्ण सापडले, त्यातील 51 प्रकरणे डेंग्यूची असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

स्वच्छता हा डेंग्यूला दूर ठेवण्याचा साधा आणि सोपा उपाय आहे. कोरोनाची चाचणी करताना डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांचीही चाचणी करून घ्यावी. या रोगाचे मूळ कारण शोधून काढून त्यावर उपाय शोधणे तेवढेच आवश्‍‍यक आहे. डेंग्यूला साधा रोग म्हणून संबोधणेही धोक्याचे ठरेल.

- डॉ. राजेश नाईक

मडगावातील सर्व प्रभागांमध्ये आरोग्य केंद्राने डेंग्‍यूबाबत जनजागृती करावी. नगरसेवकांनी जागृत रहावे व आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्यावे. मान्‍सूनपूर्व कामांना प्राधान्य दिले जाईल. नगरपालिकेशी संपर्क साधून मजुरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करेल.

- लिंडन परेरा, मडगावचे नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Budget Session 2026: गदारोळात गोवा विधानसभा अधिवेशनाचा समारोप! अर्थसंकल्प मंजूर; आचारसंहितेमुळे 7व्या दिवशीच वाजले सूप

VIDEO: ''माझी इच्छा आहे की, एक दिवस त्यानं माझ्या जागेवर यावं अन्...'', कॅप्टन कूलच्या 'त्या' पोस्टवर काय म्हणाला गंभीर?

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

SCROLL FOR NEXT