Colvale Jail  Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! कोलवाळ जेलचा सुरक्षारक्षकच ड्रग्जच्या धंद्यात

कोलवाळ पोलिसांनी ड्रग्जसह संदेश वरक या तुरुंग सुरक्षारक्षकास रंगेहात पकडले आहे. त्याच्याकडे गांजा आणि कोकेन असल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

कोलवाळ जेलमध्ये सतत अनेक घटना घडत असतात. आता हाती आलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोलवाळ जेलमध्ये कार्यरत असणाऱ्या एका सुरक्षारक्षकाकडेच अमली पदार्थ असल्याचे उघडकीस आले आहे.

कोलवाळ पोलिसांनी ड्रग्जसह संदेश वरक या तुरुंग सुरक्षारक्षकास रंगेहात पकडले आहे. त्याच्याकडे गांजा आणि कोकेन असल्याचे समोर आले आहे. याबाबत कोलवाळ पोलिसांनी कारवाई केली आहे. तो गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचा कर्मचारी आहे.

हे अमली पदार्थ जेलमधील कैद्यांना पुरुवण्यासाठी असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भातील पुढील तपास सुरू आहे.

सतत चर्चेत असणाऱ्या कोलवाळ जेलमध्ये मध्यंतरी एका विदेशी महिला कैद्याकडून कारागृहातील सुरक्षारक्षक महिलेला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र तुरुंग प्रशासनाकडून पोलिस तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्याचे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT