Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Colvale Jail Raid: गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोलवाळ पोलिसांसह तुरुंगातून ८ मोबाईल फोन, काही प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, काही मोबाईल चार्जर जप्त केले आहेत.

Sameer Panditrao

म्हापसा: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात क्राईम ब्रँचने पोलिसांच्या सहकार्याने छापा टाकला असता, पुन्हा एकदा कारागृहातील कैद्यांजवळ मोबाईल संच तसेच काही प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अनेकदा कारागृहात टाकलेल्या छाप्यांमध्ये मोबाईल, ड्रग्स आढळले होते. शनिवारी या कारवाईवेळी पोलिसांचा मोठा लवाजमा उपस्थित होता.

उपलब्ध माहितीनुसार, कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात शनिवारी (ता. ६) दुपारी अचानक छापा टाकण्यात आला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोलवाळ पोलिसांसह तुरुंगातून ८ मोबाईल फोन, काही प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, काही मोबाईल चार्जर जप्त केले आहेत. यावेळी पोलिस महानिरीक्षक, जे तुरुंगाचे ‘आयजी’ आहेत, तसेच गुन्हे शाखेचा कार्यभार सांभाळणारे उत्तर गोवा अधीक्षक राहुल गुप्ता उपस्थित होते.

कोलवाळ कारागृहात कैद्यांना बेकायदा सवलती देण्यापासून ते तुरुंगात अमली पदार्थांचा पुरवठा करण्यापासून कैद्यांकडून अयशस्वी पलायनाचे प्रयत्न झाले आहेत. शनिवारच्या कारवाईनंतर कारागृहातील सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकूणच तुरुंगातील कारभार हा रामभरोसे सुरू असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा शनिवारच्या छाप्यानंतर उघड झाला आहे.

लाखोंचा ऐवज हस्तगत

कारागृहात कैद्यांमार्फत मोबाईल फोनचा वापर केला जात असल्याची माहिती तुरूंग प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कारागृहातील सर्व विभागांची झडती घेतली.

यावेळी अंडर ट्रायल व कन्विक्ट विभागात प्रतिबंधित वस्तू सापडल्या. यात ८ मोबाईल फोन, दोन ग्रॅम गांजा, पाच पाकिटे तंबाखूचा समावेश आहे. जप्त केलेल्या इंपोर्टेड तंबाखूची किंमत ६० हजार रुपये तर गांजाची दोन हजार आहे. शिवाय मोबाईल फोन हे ॲंण्ड्रोईड असल्याने त्यांची किंमत दोन-तीन लाखांच्या घरात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

Smriti Mandhana: घरात लगीनघाई सुरु असतानाच आला हार्ट अटॅक! स्मृती मानधनाचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता; पाहुणे परतले

VIDEO: गजराजाची स्टाईल! 'भाऊ टोपी घाल' म्हटल्यावर हत्तीनं घातली... सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय Viral! तुम्ही पाहिला का?

चक दे इंडिया! टीम इंडियाच्या लेकींनी इतिहास रचला, नेपाळचा पराभव करत जिंकला विश्वचषक Watch Video

Goa Live News: गोव्यात डिसेंबरपासून 'स्मार्ट मीटर' योजना! अंतिम प्रक्रिया सुरू: मंत्री सुदीन ढवळीकर

SCROLL FOR NEXT