Colvale Jail News
Colvale JailDainik Gomantak

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात कैद्यांची 'ओली पार्टी'! मद्य-चिकन जप्त, 5 जणांना कारणे दाखवा नोटीस; तुरुंगरक्षक निलंबित

Colvale Jail Party: माहितीनुसार, ही घटना २२ जून रोजी दुपारी १.२० च्या सुमारास उघडकीस आली. कारागृहातील आयआरबी बटालियनच्या गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुरांच्या गोठ्याजवळ संशयास्पद हालचाली आढळल्या.
Published on

पणजी: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी रात्रीच्या वेळी गुरांच्या गोठ्यात ओली पार्टी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५ कैद्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, ड्युटीवरील तुरुंग रक्षक नारायण नाईक याला निलंबित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ जून रोजी दुपारी १.२० च्या सुमारास उघडकीस आली. कारागृहातील आयआरबी बटालियनच्या गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुरांच्या गोठ्याजवळ संशयास्पद हालचाली आढळल्या. यानंतर आयआरबीचे पोलिस निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची झडती घेतली असता, पाच कैदी ओली पार्टी करताना आढळले.

या कृत्यामुळे गोवा तुरुंग नियम, २०२१ मधील कलम १२६३ (२), (३), आणि १२६४ (१), (३), (७), (११), (१२) यांचे उल्लंघन केल्याचा आरोप या पाच कैद्यांवर ठेवला आहे. तुरुंग अधीक्षक शंकर गावकर यांनी २७ जून रोजी प्रत्येकास २४ तासांत लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते.

या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि कर्मचारी शिस्त याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात सखोल चौकशी सुरू आहे.

या पाच कैद्यांना नोटीस:

१. रेमंड फर्नांडिस, २. उपनेश कुमार, ३. उदय गावकर, ४. मंथेश दोडमणी, ५. प्रशांत बाहा.

Colvale Jail News
Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात गांजाची 'गोळाफेक', अल्पवयीन मुलासह चौघांचा समावेश, तिघांच्या अटकेसह दीड किलो गांजा जप्त

जप्त केलेल्या प्रतिबंधित वस्तू

प्लास्टिक कंटेनरमधील अन्नपदार्थ

शीतपेयाच्या बाटलीत संशयास्पद मद्य

पाण्याच्या बाटलीत मद्य असल्याचा संशय

डबल हत्ती छाप तंबाखूची २१ पाकिटे

गोल्डन व्हर्जिनिया तंबाखूची २ पाकिटे

सिगारेटचे ३ रोलिंग पेपर

एक लायटर

मोबाईल चार्जरचे ५ अ‍ॅडॉप्टर

२ डेटा केबल

हुवाई कंपनीचा स्मार्टफोन

एम. झेड. ब्लूटूथ स्पीकर आणि त्यात सँडिस्क पेन ड्राईव्ह

पॅक केलेला पुलाव (२ पाकिटे)

चिकन फ्राय असलेला कंटेनर

Colvale Jail News
Colvale Jail: चिंताजनक! गोव्‍यात वाढले कैदी, कोलवाळ कारागृह ‘ओव्हरफ्लो’; क्षमतेच्या तुलनेत 102% अधिक संख्या

तुरुंग रक्षकानेच पुरविले खाद्यपदार्थ

या रात्री ड्युटीवर असलेला तुरुंग रक्षक नारायण नाईक याने गैरहजर राहून कैद्यांना मद्य, खाद्यपदार्थ व अन्य वस्तू पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तो ड्युटीवर असतानाही घरी गेला होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. त्यामुळे त्याला तत्काळ निलंबित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com