Goa Colva Resort theft case Dainik Gomantak
गोवा

Colva Theft Case: विमानतळावर अटक केलेल्‍या संशयितास सशर्त जामीन

कोलवा येथील एका हॉटेलमधून 8 लाख रुपयांची रक्‍कम लंपास केल्‍याप्रकरणी दिल्‍ली विमानतळावरुन अटक करुन गोव्‍यात आणलेल्‍या मूळ उत्तर प्रदेेशातील दिग्‍ग्विजय सिंग (22) याला मडगावच्‍या न्‍यायालयाने अटी घालून जामिनावर सोडण्‍याचा बुधवारी आदेश दिला.

दैनिक गोमन्तक

कोलवा येथील एका हॉटेलमधून 8 लाख रुपयांची रक्‍कम लंपास केल्‍याप्रकरणी दिल्‍ली विमानतळावरुन अटक करुन गोव्‍यात आणलेल्‍या मूळ उत्तर प्रदेेशातील दिग्‍ग्विजय सिंग (22) याला मडगावच्‍या न्‍यायालयाने अटी घालून जामिनावर सोडण्‍याचा बुधवारी आदेश दिला.

कोलवा येथील एका रिसॉर्टमध्‍ये संशयित दिग्‍वीजय सिंग काम करीत असताना 8 लाख रुपये घेऊन पसार झाला होता. त्‍याने आपल्‍या रिसॉर्टच्‍या संचालकांच्‍या कार्यालयातील दोन किंमती मूर्तीचीही चोरी केली होती. पोलीस तपासात संशयित दिल्‍लीला जाणाऱ्या विमानात असल्‍याचे समजल्‍यानंतर पोलिसांनी दिल्‍ली विमानतळावर संदेश पाठवून त्‍याला ताब्‍यात घेण्‍याची विनंती केली होती.

त्‍यानंतर त्‍याला दिल्‍ली विमानतळावरील ताब्‍यात घेतले आणि नंतर गोवा पोलिसांनी त्‍याला गोव्‍यात आणले होते. त्‍याच्‍याकडून रोख 7,50,000 रुपये आणि दोन मूर्ती जप्‍त करण्‍यात आल्‍या होत्‍या.

गोव्याबाहेर जाता कामा नये

संशयिताने 20 हजारांचे बॉण्‍ड व एक स्‍थानिक हमीदार सादर करावा. फायनल रिपोर्ट सादर करेपर्यंत संशयिताने चौकशी अधिकाऱ्यापुढे पाहिजे तेव्‍हा हजर व्‍हावे, चौकशी अधिकाऱ्यांना पूर्व कल्‍पना न देता गोव्‍याबाहेर जाता कामा नये, अशा प्रकारच्‍या अनेक अटी घालून मडगावच्‍या न्‍यायदंडाधिकारी पुजा सरदेसाई यांनी वरील अर्जदाराचा अर्ज मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

SCROLL FOR NEXT