P.S.Shreedharan Pillai : राज्यपालांनी जपली सामाजिक बांधिलकी; 384 रुग्णांना 96 लाखांची मदत

एकाचवेळी तीन पुस्तकांचे प्रकाशन त्यातच लेखकाने पुस्तक प्रकाशनचा दोनशेचा टप्पा गाठला. त्यामुळे साहजिकच आनंदाचा दिवस.
Goa Governor P.S.Shreedharan Pillai
Goa Governor P.S.Shreedharan Pillai Dainik Gomantak

एकाचवेळी तीन पुस्तकांचे प्रकाशन त्यातच लेखकाने पुस्तक प्रकाशनचा दोनशेचा टप्पा गाठला. त्यामुळे साहजिकच आनंदाचा दिवस. अशा आनंदाच्या दिवशीही सामाजिक बांधिलकी विसरलो नाही हे राज्यपालांनी आज दाखवून दिले. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी कर्करोगग्रस्त आणि मुत्रपिंड विकारावर उपचार घेणाऱ्या राज्यातील 384 रुग्णांना 96 लाख रुपयांची मदत पुस्तक प्रकाशन सोहळ्यातच वितरीत केली. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी ती स्वीकारली.

Goa Governor P.S.Shreedharan Pillai
Indian Railway मध्ये मिळणार 'सात्विक भोजन': IRCTC ने इस्कॉन मंदिराशी केला करार

गोव्यातील वारसा वृक्ष, जेव्हा समांतर रेषा भेटतात आणि एन्टे प्रिया कविताकल या राज्यपाल लिखित तीन पुस्तकांचे प्रकाशन राजभवनाच्या जून्या दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, ज्ञानपीठकार दामोदर मावजो, आर्चबिशप फिलीप नेरी कार्निडल फेर्राव, रामकृष्ण मिशन गोवाचे सचिव स्वामी महेशात्मानंद आणि पत्रकार पाचू मेनन उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल म्हणाले, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मी प्रेरणा केली. राज्य घटनेनुसार जनताच सर्वोच्च असते. त्यामुळे पद कोणतेही असो वा नसो लोकांची सेवा हाच हेतू सदोदीत बाळगला पाहिजे. वामनवृक्षकला ही ५ हजार वर्षे जूनी आहे. ती भारतातून चीनमार्गे जपानमध्ये गेली. जपानने ४०० वर्षांपूर्वी बोन्साय असे नामकरण केले. त्यावर पुस्तक लिहीत आहे.

Goa Governor P.S.Shreedharan Pillai
Shrawan Special: ‘द किचन ऑन टॉप’तर्फे सात्विक भोजन महोत्सव

दरम्यान, मावजो यांनी राज्यपालानी कल्पनांचे जनक संबोधले. ते म्हणाले, मातृभाषा ही प्रदर्शित करण्याची गोष्ट आहे. केरळमधील कार्यक्रमात मी वगळता इतर सर्वांची मल्याळमध्ये भाषणे झाली होती. राज्यपालांनी अभिवक्त होण्यासाठी (कवितेच्या माध्यमातून) मातृभाषेची निवड केली यातून आमच्या साहित्यिकांनी प्रेरणा घ्यावी. राज्यपालांचे सचिव एम. आर. एम. राव यांनी स्वागत केले तर प्रधान खासगी सचिव टी. एच. वल्सराज यांनी आभार मानले.

गोव्याच्या निसर्गाची श्रीमंती शब्दबद्ध

चारशे गावांना भेट देणारे पिल्लई हे एकमेव राज्यपाल आहेत. गोव्याच्या निसर्गाची श्रीमंती त्यांनी अनुभवली आणि शब्दबद्ध केली आहे. त्यांची निसर्ग सांस्कृतिक प्रवास हा प्रेरणादायी असाच आहे. वृक्षस्थळी देवाची व दृष्ट शक्तींची वस्ती असते असा समज आहे. त्यांच्या लेखनातून वृक्षांकडे बधण्याची वेगळी दृष्टी सर्वांना मिळेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com