Delhi youth found in goa Dainik Gomantak
गोवा

Colva: 'मी जीवन संपवत आहे'! गोव्यात येऊन भावाला केला फोन; दिल्लीहून बेपत्ता झालेला युवक सापडला कोलव्यात

Missing youth delhi: दिल्लीहून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय युवकाचा शोध कोलवा पोलिसांनी लावला आहे. सचिनबाय असे या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील फतेहपूर येथील रहिवासी आहे.

Sameer Panditrao

कोलवा : दिल्लीहून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय युवकाचा शोध कोलवा पोलिसांनी लावला आहे. सचिनबाय असे या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील फतेहपूर येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तो अचानक घरातून बेपत्ता झाला होता. त्याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

सचिन गोव्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने आपल्या भावाला फोनवरून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. या संभाषणामुळे कुटुंबीय अधिक चिंताग्रस्त झाले. त्याच्या मोबाईलचे लोकेशन कोलवा परिसरात आढळून आल्यावर दिल्ली पोलिसांनी त्वरित कोलवा पोलिसांना याबाबत कळवले.

यानंतर कोलवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वर्षदा नाईक देसाई तसेच पोलिस शिपाई प्रदीप भाटीकर आणि दीपराज नाईक यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत तसेच फोटोवरून ओळख पटवत पोलिसांनी सचिनचा शोध लावण्यात यश मिळविले.

शोध लागल्यानंतर दिल्ली पोलिस व सचिनच्या कुटुंबीयांना त्याबाबत कळविण्यात आले. युवक सुरक्षित असल्याचे स्पष्ट होताच कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला. योग्य वेळी केलेल्या समन्वयातून व सतर्कतेतून कोलवा पोलिसांनी ही कारवाई पार पाडली.

या घटनेतून वेगवेगळ्या राज्यांतील पोलिस यंत्रणांमधील माहितीची देवाणघेवाण व तातडीचा प्रतिसाद किती महत्त्वाचा ठरतो, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. युवकाची मानसिक स्थिती लक्षात घेता पुढील काळात त्याला समुपदेशनाचीही गरज भासू शकते, असे पोलिसांकडून सूचित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa Coconut Price: नारळ अजून महागच! टोमॅटो, कांदाही भडकला; वाचा ताजे दर

Goa News Live: ओपा प्रकल्पातील पंप अखेर सुरु, राजधानीला मिळणार पाणी

Zilla Panchayat Election: गोवा फॉरवर्ड, ‘आप’कडून जोर, काँग्रेस स्‍वस्‍थच! जिल्‍हा पंचायत निवडणूक; सरदेसाईंकडून उमेदवार चाचपणी

SCROLL FOR NEXT