Mirabag Savarde: 'अन्यथा आमची दैवते अन गावे पाण्याखाली जातील'! मीराबाग-सावर्डेत बंधाऱ्याविरुद्ध आंदोलन; राखणदाराला घातले गाऱ्हाणे

Mirabag Savarde Barrage: जोपर्यंत हा प्रकल्प सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे लोकांनी सांगितले.
Mirabag Savarde
Mirabag SavardeDainik Gomatnak
Published on
Updated on

कुडचडे: मीराबाग-सावर्डे येथे जुवारी नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याला लोकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या नदीवर बंधारा बांधल्यास याची झळ नदीकाठावरील गावांना बसणार असून आमची दैवते नदीकाठावर असल्याने ती पाण्याखाली जाण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक लोकांनी नदीकिनारी जाणाऱ्या रस्त्यावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत हा प्रकल्प सरकार रद्द करीत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे लोकांनी सांगितले.

दीड वर्षापूर्वी हा प्रकल्प गावात येणार, असे समजताच लोकांनी त्याला विरोध केला होता; पण लोकांची दिशाभूल करून पुन्हा एकदा हा प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सरकारकडून मुद्दाम केला जात असल्याने लोक संतापले आहेत, असे उपेंद्र नाईक यांनी सांगितले. मीराबाग येथे जुवारी नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याविषयी स्थानिक लोकांना विश्वासात घेतले नाही.

तसेच या प्रकल्पाचे सादरीकरण लोकांना दाखविले नसल्याने या प्रकल्पाविषयी लोकांना संशय असल्याने याला विरोध केल्याचे त्यांनी सांगितले. या नदीवर बंधारा बांधल्यास याची झळ नदीच्या काठावर वसलेल्या गावांना बसणार आहे, तसेच आमची दैवते नदीच्या काठावर असून ती पाण्याखाली जाण्याची भीती आम्हाला आहे, असे आपा नाईक यांनी सांगितले.

ज्या कारणासाठी हा बंधारा बांधला जात आहे त्याला आमचा विरोध नाही. ज्या लोकांना पाणी पुरवण्याचा हा प्रयत्न सरकार करत आहे, त्या लोकांना नदीचे पाणी पंपाद्वारे द्यावे. त्यामुळे बांधाऱ्याची गरज भासणार नसल्याचे नाईक यांनी सांगितले. हा बंधारा कोणत्याही स्थितीत बांधू देणार नसून हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

Mirabag Savarde
Mirabag Savarde: मिराबागेत तणावाची स्थिती! यंत्रसामग्री हटवली; सावर्डेत बंधाऱ्याला वाढला विरोध Watch Video

म्हारूदेवाला गाऱ्हाणे

या बंधाऱ्याविरोधात आंदोलन सुरू करण्यापूर्वी स्थानिकांनी सकाळी राखणदार म्हारूदेवाला नारळ ठेवून गाऱ्हाणे घातले. जोपर्यंत हा जाचक प्रकल्प रद्द केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Mirabag Savarde
Savardem: 'बंधाऱ्यावरून गावात फूट पाडण्याचे प्रयत्न'! मीराबाग येथील लोक एकवटले; सावर्डेत तीव्र विरोध

सरकारने भूमिका जाहीर करणे गरजेचे

मीराबाग-सावर्डे येथे जुवारी नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याविषयी राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. सरकारने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्यामुळे स्थानिक संभ्रमात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com