Cold Wave in goa Dainik Gomantak
गोवा

कोरोनासंसर्ग वाढताच, वाढत्या थंडीचा परिणाम?

गोव्यात कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस मोठी वाढ

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सध्या वाढत्या थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची सातत्याने वाढतानाच दिसत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे कोरोना संसर्ग वाढतोय की काय असं चित्रच जणू गोव्यात निर्माण झाल्याचं दिसत आहे. (Cold Wave in goa News Update)

गोव्यात (Goa) गेल्या आठवड्याभरापासून कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला आदी आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातच अनेक रुग्णांचे कोरोना तपासणी अहवालही पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. त्यामुळे थंडीमुळे (Winter) कोरोना वाढतोय का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. साहजिकच याचा ताणही राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर पडताना दिसत आहे.

कोरोनाच्या (Corona) जाळ्यात सर्वसामान्य नागरिकांसह आरोग्य कर्मचारीही पडताना दिसत आहेत. त्याचा अतिरिक्त ताणही आरोग्यसेवेवर पडू लागला आहे. अनेक रुग्णांच्या आरटीपीसीआर टेस्टचा निकालही अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे दरदिवशी वाढणाऱ्या रुग्णांची संख्या ही आणखी जास्त असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच! एकानं ठोकलं ताबडतोब त्रिशतक, दुसऱ्याचं द्विशतक; 50 ओव्हर्समध्ये उभा केला 822 धावांचा डोंगर

IPL 2026 Points Table: पंजाबचा विजयाचा रथ रुतला, हाय-स्कोअरिंग सामन्यात दिल्लीनं मारली बाजी; गुणतालिकेत मोठा उलटफेर

अमेरिकेत महापौरपदी 'चीनी एजंट'! 'US News Center' च्या नावाखाली चालवला प्रोपगंडा; ईलीन वांगला होणार 10 वर्षांची शिक्षा?

Vish Yog 2026: ग्रहांच्या महायुतीनं बनला 'विष योग'! 3 राशींच्या डोक्यावर संकटाची टांगती तलवार; शनीची चाल बदलणार नशीब

Viral Video: 'दोरी ओलांडली अन् भारतात घुसले'; पाकिस्तानी इन्फ्लुएंसरचा अजब दावा, नेटकऱ्यांनी काढली चांगलीच खोड

SCROLL FOR NEXT