Goa Mining Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Updates: वेदांतानं नाकारलं, पण नियतीनं दिला न्याय! 23 कुटुंबांचा वनवास संपला, गेमचेंजर ठरली आमदारांची 'ती' चाल!

Codli Mine Workers: कोडली खाण परिसरातील बेरोजगार असलेल्या २३ खाण कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कुळे: कोडली खाण परिसरातील बेरोजगार असलेल्या २३ खाण कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला आहे. उर्वरित २८ कामगारांनाही खाणकाम वाढल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील, अशी माहिती सावर्डेचे आमदार तथा सभापती गणेश गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोडली खाण पूर्वी वेदांता कंपनीच्या ताब्यात असताना खाणकाम बंद पडल्यामुळे अनेक कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. त्यानंतर लिलाव प्रक्रियेत ‘जेएसडब्ल्यू’ कंपनीला हा खाणपट्टा मिळाला. खाणकाम पुन्हा सुरू होण्याच्या तयारीदरम्यान बेरोजगार कामगारांनी आपली व्यथा आमदार गावकर यांच्यासमोर मांडली होती.

या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गावकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. तसेच नवीन खाणपट्टाधारक कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून पूर्वी नोकरीवरून कमी झालेल्या कामगारांना प्राधान्याने रोजगार देण्याची मागणी केली. त्यानुसार सुरवातीला १३ कामगारांना पुन्हा नोकरी देण्यात आली होती.

आता आणखी १० कामगारांना रोजगार मिळाल्याने एकूण २३ जण पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. अद्याप २८ कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगताना गावकर यांनी खाण कंपन्यांना पूर्वी नोकरी गमावलेल्या आणि निवृत्तीचे वय पूर्ण न झालेल्या कामगारांना प्राधान्य देण्याची अट असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे खाणकामाचा विस्तार होताच उर्वरित सर्व कामगारांनाही रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्योगांनाही मिळेल चालना

खाणकाम पुन्हा सुरू झाल्याने केवळ कामगारांनाच नव्हे, तर वाहतूक, यंत्रसामग्री, किरकोळ व्यवसाय आणि इतर पूरक उद्योगांनाही चालना मिळणार आहे. यामुळे परिसरातील आर्थिक घडामोडींना नवे बळ मिळेल, असेही सभापती गणेश गावकर म्हणाले.

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यश

रोजगार मिळालेल्या कामगारांपैकी शैलेश विर्डीकर यांनी सरकार आणि आमदार डॉ. गणेश गावकर यांचे आभार मानले. खाणपट्टा रद्द झाल्यानंतर अनेक कामगार दोन ते चार वर्षे बेरोजगार होते. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रोजगाराचा मार्ग मोकळा झाला. उर्वरित २८ कामगारांनाही लवकरच नोकरी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT