Codar IIT Project  Dainik Gomantak
गोवा

Codar IIT Project: ‘आयआयटी आमका नाका'! कोडार ग्रामस्थ आक्रमक; सत्तरी, सांगे, केपेनंतर राज्य सरकारला मोठा झटका

Goa IIT Project: कोडार ग्रामस्थांची बैठक कोडार कोमुनिदाद क्षेत्रात झाली. आयआयटीसाठी जागा ताब्यात घेण्याच्या सरकारी प्रयत्नांचा यावेळी निषेध करण्‍यात आला.

Sameer Panditrao

फोंडा: राज्यात सर्वत्र आयआयटी उभारण्यास विरोध होत असतानाच, आज कोडार-फोंडा येथेही ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप नोंदविला. ‘आयआयटी आमका नाका’ अशी घोषणा देऊन ग्रामस्थांनी एकजूट दाखवली. प्रसंगी आंदोलन उभारण्याचाही इशारा दिला.

कोडार ग्रामस्थांची बैठक कोडार कोमुनिदाद क्षेत्रात झाली. आयआयटीसाठी जागा ताब्यात घेण्याच्या सरकारी प्रयत्नांचा यावेळी निषेध करण्‍यात आला. ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम राबवून लोकप्रतिनिधी व संबंधित सरकारी खात्‍यांना निवेदने देण्याचा निर्णय घेतला.

तसेच स्थानिकांच्या हिताला धक्का पोहोचवणारा हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी लावून धरली. बेतोडा पंचायत क्षेत्रातील कोडार येथील साडेचौदा लाख चौरस मीटर जमीन (कोमुनिदाद) आयआयटीसाठी ताब्यात घेण्याकरिता सरकारने प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी स्थानिक लोकांना हरकती असल्यास ३० दिवसांत देण्याची सूचना सरकारकडून करण्यात आली होती. त्यास अनुसरून कोडार ग्रामस्‍थांची ही बैठक घेण्यात आली.

प्रकल्पाबाबत ग्रामस्थांची भीती

कोमुनिदादच्‍या या साडेचौदा लाख चौरस मीटर जमिनीपैकी फक्त २ लाख चौरस मीटर डोंगराळ भाग असून उर्वरित शेती व बागायतींनी व्यापलेली आहे. तसेच या निसर्ग परिसरात बिबट्या, गवे, रानडुक्कर यांसारखे वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आहेत. त्‍यांच्‍यावर गदा येईल. तसेच ओपा जलप्रकल्पावर परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्‍थांनी व्‍यक्त केली.

सत्तरी, सांगे, केपेनंतर आता कोडार!

राज्यात आयआयटी उभारण्याचा दृढ निश्‍चय केलेल्या राज्य सरकारला हा जोरदार झटका आहे. यापूर्वी सत्तरी, सांगे आणि केपेत लोकांनी आयआयटी उभारण्यासाठी जोरदार विरोध दर्शवला होता. सत्तरी येथे तर मोठे आंदोलन छेडले गेले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आता कोडारवासीयही एकवटले आहेत.

स्थानिकांना विश्‍‍वासात न घेता सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. गरज पडल्यास उग्र आंदोलन उभारू.
विश्राम गावकर, ग्रामस्‍थ
निसर्ग व गाव वाचवण्यासाठी ग्रामस्थ नेहमी सज्ज आहेत. आयआयटी प्रकल्‍पासाठी दुसरी जागा निवडावी.
पांडुरंग गावकर, ग्रामस्‍थ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naibag Firing: 3 वर्षांपूर्वीची गोव्यातील चतुर्थी, वाळूमाफियांचा कुडचडेत गोळीबार; कामगाराने गमावला होता प्राण

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपसा रोखण्‍यासाठी गोव्यात दिशानिर्देशांचे पालन होतेय का?

Gold Silver Rate Today: सोनं, चांदी झालं महाग! काय आहेत मुंबई, गोवा, पुणे आणि नागपुरात ताजे भाव? वाचा

'त्यांचे वय झाल्याने त्यांना आदल्या दिवशी काय बोललो, याची आठवण नसावी', वीजदरवाढीच्या गोंधळावरून आपची ढवळीकरांवर टीका

Goa Village Survey: 'मच्छीमार' गावांचे सीमांकन वादग्रस्त! तज्ज्ञांकडून तपासाची मागणी; नकाशांचा शहानिशा अनिवार्य

SCROLL FOR NEXT