Codar IIT Project Dainik Gomantak
गोवा

Codar IIT Project: ‘आयआयटी’ प्रकल्प नकोच! कोडार ग्रामस्थ भूमिकेवर ठाम; CM सावंतांसोबत होणार चर्चा

Goa IIT Project: कोडार-बेतोडा येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थ एकवटले असून विरोधाची ही धार अधिक तीव्र बनत चालली आहे. ‘आयआयटी’ प्रकल्प नको, अशा भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिले.

Sameer Panditrao

फोंडा: कोडार-बेतोडा येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थ एकवटले असून विरोधाची ही धार अधिक तीव्र बनत चालली आहे. रविवारी कोडार येथील बेताळ देवस्थानच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ‘आयआयटी’ प्रकल्प नको, अशा भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिले.

या बैठकीत ग्रामस्थांनी आयआयटी विरोधातील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वांना एका छत्राखाली आणण्याबरोबर कोमुनिदाद प्रशासक, बेतोडा पंचायत व इतर सर्व संबंधितांसह विरोधी पक्ष आमदारांनाही यासंदर्भात निवेदन देण्याचे ठरले.

या बैठकीला विश्राम गावकर तसेच इतर उपस्थित होते. बैठकीत ग्रामस्थांसमवेत ‘आरजी’ नेते तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. बैठकीत आयआयटी कोडार येथे उभारल्यास त्याचे दुष्परिणाम काय होतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आयआयटी प्रकल्पामुळे आमच्या समस्यांमध्ये वाढ होणार अशी चिंता यावेळी उपस्थित काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. येत्या तीन-चार दिवसांत मुख्यमंत्र्यांकडे ग्रामस्थांची चर्चा होणार असून या बैठकीत मुख्यमंत्र्यांना कोडार गावच्या जैवविविधता तसेच निसर्ग संपन्नतेबाबतही सांगण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Purple Fest Goa: 'पर्पल फेस्ट'चा तिसरा अध्याय पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती!

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ

Renuka Devi History: यल्लम्मादेवी! नरसंहारातील पीडित समुदायांची तारणहार

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT