Coconut Shell Dainik Gomantak
गोवा

Coconut Price: नारळ अजून महागलेलाच! तुटवड्यामुळे दरात वाढ; माकडांचा उपद्रव वाढल्याने बागायतदार हैराण

Coconut Price In Goa: राज्यात मागील महिन्याभरापासून नारळाचा तुटवडा भासत असून राज्यातील शहरी भागासहित ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नारळाचे दर वाढले आहे.

Sameer Panditrao

Coconut price hike

पणजी: राज्यात मागील महिन्याभरापासून नारळाचा तुटवडा भासत असून राज्यातील शहरी भागासहित ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नारळाचे दर वाढले आहे. मध्यम आकाराचा एक नारळ ४० रुपये दराने विकला जात आहे.

खेती, माकडांमुळे नारळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नारळाचे पीक घटल्यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत.परराज्यातून गोव्यात येणाऱ्या नारळांची देखील आवक काही प्रमाणात घटली असल्याने मोठ्या प्रमाणात दर वाढले आहेत तर नवीन पाडा येईपर्यंत हा दराचा भडका कायम राहणार असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे.

आणखी एक महिनाभर तरी नारळ महागलेला असेल. कारण नवा नारळ बाजारात यायला किमान महिना लागणार आहेत, अशी माहिती सत्तरीतील शेतकऱ्यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या स्थानिक भाज्या बाजारात दाखल झाल्याने बेळगावहून येणाऱ्या भाजीपेक्षा स्थानिक भाज्यांना अधिक मागणी आहे. लालभाजी, मुळा, पालक, आदी पालेभाज्या पन्नास रुपयांना तीन जुडी दराने विकली जात आहे. तर इतर भाज्या जशा भेंडी, चिटकी, वांगी, आदी भाज्याही मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत.

राज्यात इतर भाज्या जसे की कांदा, बटाटा प्रती किलो ३० ते ५० रुपयांना विकले जात आहेत. कांदीकाही प्रमाणात स्वस्थ झाला आहे. फळभाज्यांचे दरही मागील आठवड्यापासून स्थिर आहेत. हिरवी मिरची, बिन्स प्रती किलो १२० रुपये दराने विकली जात आहे.

कैऱ्या दाखल!

पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात मक्याची कणसे दाखल झाली आहेत. १०० रूपयांना ५ कणसे विकली जात आहेत. राज्यात लसणाची फोडणी अजूनही महागलेलीच आहे. लसूण ४०० रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे. यासोबतच बाजारात छोट्या कैऱ्या दाखल झाल्या आहेत. १०० रुपयांना ६ दराने त्या विकल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT