Goa crime control X
गोवा

Goa Tourism: गोव्यात 'पर्यटकांसाठी' सरसावले पोलीस! किनाऱ्यांवर विशेष पथके तैनात; शॅक्स, हॉटेलवर राहणार बारीक लक्ष

Goa Tourist: किनारपट्टीवरील शॅक तसेच हॉटेलमध्ये रात्री १० वाजल्यानंतर संगीत बंद करण्याची तसेच मद्य विक्रीचा परवानाच्या वेळेनंतर विक्री झाल्यास कारवाई करण्यात येत आहे.

Sameer Panditrao

Coastal area crime and tourist safety Goa Beach Shacks

पणजी: किनारपट्टी परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारी घटना व कारवायांमुळे पर्यटन क्षेत्राची बदनामी होण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यामुळे पोलिस प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन किनारपट्टी परिसरात पर्यटन पोलिसांव्यतिरिक्त विशेष पोलिस गस्त वाढवून पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता तसेच शॅक तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलिस सूत्राने दिली.

काही दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी क्षुल्लक कारणावरून एका शॅकमधील कर्मचाऱ्यांनी पर्यटकाच्या गटाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या एका घटनेत शॅक मालक व त्याच्या कर्मचाऱ्यांनी एका पर्यटक गटाला मारहाण केल्याने एकजण गंभीर जखमी होऊन त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले गेले होते. त्यामुळे गोव्यात स्थानिक व्यावसायिकांकडून पर्यटकांची लूट व मारहाण केली जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस प्रमुखांना यासंदर्भात किनारपट्टी परिसरात अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच्या अनुषंगानुसार उत्तर गोव्यातील कळंगुट, बागा व हणजूण या भागात रात्रीच्यावेळी उशिरा सुरू असलेल्या संगीत पार्ट्या तसेच ध्वनी प्रदूषण याविरुद्ध कारवाईसाठी विशेष पोलिस पथके विविध भागासाठी तैनात केली आहेत.

कळंगुट व हणजूण पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त आणखी काही पोलिसांची वर्णी लावण्यात आल्याचे या सूत्राने सांगितले.

ध्वनी मोजमाप यंत्रणाची सक्ती

सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ध्वनी प्रदूषणसंदर्भातची जनहित याचिका प्रलंबित आहे. खंडपीठानेही ध्वनी प्रदूषणाची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाला ध्वनी मोजमाप यंत्रणा बसवण्याचे निर्देश दिलेले आहेत. ज्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार वारंवार दाखल झालेल्या आहेत त्यांना ही यंत्रणा सक्तीची केली आहे. पोलिसांची रात्रीची गस्त व कर्मचारीही वाढ करून गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे हा अधिकारी म्हणाला.

...तर शॅक व्यावसायिकांविरुद्धही कारवाई

सध्या किनारपट्टीवरील शॅक तसेच हॉटेलमध्ये रात्री १० वाजल्यानंतर संगीत बंद करण्याची तसेच मद्य विक्रीचा परवानाच्या वेळेनंतर विक्री झाल्यास कारवाई करण्यात येत आहे. रात्री उशिरा मद्य विक्री परवान्याचे उल्लंघन करून होत असल्याने त्यावरच लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती पर्यटन पोलिस विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास शॅक व व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही होत असल्याचे त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT