coal transport In barge Dainik Gomantak
गोवा

Cumbarjua Canal: कुंभारजुवे खाडी धोक्यात; पर्यावरणप्रेमींकडून चिंता

दैनिक गोमन्तक

Coal Transport In Barge By Cumbarjua Canal: गोव्यात कोळसा वाहतुकीसंदर्भात तीव्र असंतोष होत असतानाच आता कुंभारजुवे कालव्यातून अतिरिक्त कोळसा वाहतूक सुरू झाल्याने या खाडीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

जलवाहतुकीविषयी रीतसर अभ्यास न करता प्रदूषण नियंत्रण मंडळ, बंदर कप्तान खाते व मुरगाव बंदर प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतांमुळे नद्या व खाडींवर संकट ओढवू लागले आहे.

कुंभारजुवे खाडीतून दरवर्षी पावसाळ्यात बंदर कप्तान खात्याकडून वेदांता कंपनीला मुरगाव बंदरातून कोळसा वाहतुकीला परवानगी दिली जाते.

सोमवारी एका पाठोपाठ सहा बार्ज मुरगाव बंदरातून झुआरी नदीमार्गे कुंभारजुवे खाडीतून आमोणे येथील वेदांता कंपनीकडे कोळसा घेऊन गेल्या होत्या.

मांडवी आणि झुआरी या दोन्ही नद्यांमधील पाणी त्यामुळे प्रदूषित होत असल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

पर्यावरण अभ्यासक अभिजित प्रभुदेसाई यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की गोव्यातील कोळसा हाताळणी पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. या वाहतुकीचा आपल्या अन्न उत्पादनावर वाईट परिणाम होत असून ते फार घातक आहे.

खाडीचा पर्यावरणीय अभ्यास होणे आवश्‍यक

कुंभारजुवे खाडीचा बऱ्याच वर्षांपूर्वी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने (एनआयओ) पर्यावरणीय अभ्यास केला होता. त्या अभ्यासात या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात मासळी, शिंपले मिळतात.

त्याशिवाय या खाडीत मगरीचे अस्तित्व आहे. या खाडीतून ज्या पद्धतीने कोळसा वाहतूक वाढली आहे, ते पाहता या खाडीचा पर्यावरणीय अभ्यास होणे फार महत्त्वाचे असल्याचे एनआयओच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने दै. ‘गोमन्तक’ला सांगितले.

दरवर्षी पावसाळ्यात मासेमारीवर परिणाम

दरवर्षी पावसाळ्यात अशाप्रकारे कोळसा वाहतुकीला बंदर कप्तान खात्याकडून परवानगी दिली जाते. मांडवी आणि झुआरी नदीला ही खाडी जोडली गेली असल्याने दोन्ही नद्यांमधील जलचर प्राण्यांची या खाडीतूनच ये-जा होत असते.

पावसाळ्यात समुद्रात मासेमारीवर बंदी येत असल्याने स्थानिक मच्छीमार या खाडीत मासेमारी करीत असतात. मागील काही वर्षांत कोळसा वाहतूक वाढल्याने या मोठ्या मासेमारीवरही त्याचा परिणाम जाणवत असल्याचे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे.

अधिसूचनेद्वारे कोळसा वाहतूक

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे बंदर कप्तान खात्याकडून कुंभारजुवे खाडीतून जलवाहतूक करण्यास परवानगी दिली जाते.

१५ जून ते १५ सप्टेंबर या काळात कोळसा वाहतूक होते, त्याविषयी अधिसूचनाही काढली जाते, असे बंदर कप्तान खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

"कुंभारजुवे कालव्यातून कोळसा वाहतुकीला ज्या पद्धतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बंदर कप्तान खाते मान्यता देते ते घातक आहे. या मान्यता देण्यापूर्वी कोळसा वाहतूक व बार्ज वाहतुकीमुळे नदीवर होणारा परिणाम याचा अभ्यास करायला पाहिजे होता."

"असा कोणताही अभ्यास कुंभारजुवे कालव्यासंबंधी झालेला नाही. या नद्यांमध्ये वाहतूक सुरू करण्यापूर्वी लोकांना विश्‍वासात घ्यायला हवे होते, तेही घेतले गेलेले नाही. त्यामुळे ही वाहतूक पूर्णतः लोकविरोधी आहे."

ऐक पर्यावरण अभ्यासक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT