Goan Boys Rama Dhawaskar & Nitin Sawant Bag Silver In International Beach Volleyball Championship
Goan Boys Rama Dhawaskar & Nitin Sawant Bag Silver In International Beach Volleyball ChampionshipDainik Gomantak

International Beach Volleyball Championship: रामा धावसकर-नितीन सावंत रौप्यपदकाचे मानकरी

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्रता
Published on

Goan Boys Bag Silver In International Beach Volleyball Championship: भारताचे आंतरराष्ट्रीय बीच व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रतिनिधित्व करताना गोव्याच्या रामा धावसकर व नितीन सावंत जोडीने रौप्यपदकाची कमाई केली.

बांगलादेशमधील कॉक्स बझार येथे झालेल्या बंगबंधू एव्हीसी बीच काँटिनेंटल कप स्पर्धेच्या पहिल्या टप्यातील अंतिम लढतीत भारतीय संघाला इराणकडून हार पत्करावी लागली, मात्र रौप्यपदकासह भारतीय चमूने ऑलिंपिक पात्रतेच्या पुढील टप्प्यात प्रवेश केला.

रामा धावसकर-नितीन सावंत या जोडीसह तमिळनाडूच्या रॉबिन रवी-बराथ सोमू जोडीने बांगलादेशमधील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

रामा व नितीन जोडीला इराणच्या बहमान सालेमिलिन-सिना शोकाती जोडीने, तर रवी-सोमू जोडीला पौरासगरी अब्बास-अलीरेझा घसाब जोडीने हरविले. त्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इराणचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

ऑलिंपिक २०२४ मधील बीच व्हॉलिबॉलसाठी पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यात भारत व इराणसह भूतान, कझाकस्तान, कीर्गिझस्तान, पाकिस्तान, उझबेकिस्तान, मालदीव, यजमान बांगलादेश असे आठ संघ सहभागी झाले होते.

रामा व नितीन जोडी आता बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या काव्हा बीच व्हॉलिबॉल या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळतील.

Goan Boys Rama Dhawaskar & Nitin Sawant Bag Silver In International Beach Volleyball Championship
FC Goa: एफसी गोवा संघाच्या नेतृत्वात बदल; नंदन पिरामल नवे अध्यक्ष

मौल्यवान आंतरराष्ट्रीय अनुभव ः धावसकर

इराणचा संघ बलवान होता, मात्र या स्पर्धेद्वारे मिळालेला आंतरराष्ट्रीय अनुभव मौल्यवान ठरला, अशी प्रतिक्रिया रामा धावसकर याने कॉक्स बझार येथून सोमवारी दिली.

गोमंतकीय व्हॉलिबॉलमध्ये ‘पप्पू’ या टोपणनावाने लोकप्रिय असलेला रामा क्रीडा व युवा व्यवहार खात्याचा व्हॉलिबॉल प्रशिक्षक असून नितीन पोलिस दलात आहे. त्यांना प्रल्हाद धावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.

‘‘बांगलादेशमधील स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय बीच व्हॉलिबॉलपटूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे आमच्या कौशल्याचीही चाचपणी करता आली. इराणचे बीच व्हॉलिबॉलपटू व्यावसायिक आहेत, आम्ही त्यांना जोरदार टक्कर दिली. स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेले दोन्ही संघ ऑलिंपिक पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यात दाखल झाले आहेत. हा आंतरराष्ट्रीय अनुभव गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळताना नक्कीच फायदेशीर ठरेल,’’ असे रामा म्हणाला.

Goan Boys Rama Dhawaskar & Nitin Sawant Bag Silver In International Beach Volleyball Championship
IND vs PAK: विराट-केएल राहुलने पाकिस्तानविरुद्ध विक्रमांचाही पाडला पाऊस, पाहा स्पेशल 7 रेकॉर्ड्स

एशियाड खेळण्याची संधी हुकली

जुलै महिन्यात रामा व नितीन जोडीने चेन्नईतील मरिना बीचवर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पात्रता स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपद पटकावले होते.

गोमंतकीय जोडी चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (एशियाड) पात्र ठरली, परंतु या जोडीला आंतरराष्ट्रीय बीच व्हॉलिबॉल मानांकन नसल्याचे कारण देत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बीच व्हॉलिबॉल संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी दिली नाही, त्यामुळे रामा-नितीन जोडीची संधी हुकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com