Goa Hill Cutting|Goa Land Conversions Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: आयपीबीने मंजुरी दिलेले सर्व प्रकल्प रद्द करा! 'मेगा प्रोजेक्ट्स'वरुन काँग्रेस आक्रमक

Mega Projects In Goa: नो डेव्हल्पमेंट झोनच्या जमिनी आयपीबी हडप करीत आहे, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा (आयपीबी) हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी नगरनियोजन खात्याकडील सर्व मेगा प्रकल्पांची तपासणी आपण करू असे जाहीर केले, परंतु त्या प्रकल्पांची कसलीच चौकशी होत नाही. नो डेव्हल्पमेंट झोनच्या जमिनी आयपीबी हडप करीत आहे, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा (Investment Promotion Board) हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप करीत आयपीबीने मंजुरी दिलेले सर्व प्रकल्प रद्द करावेत, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. तुलियो डिसोझा यांनी केली.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर, नीलेश धोंड, संदीप पेडणेकर, वीरेंद्र शिरोडकर आदी उपस्थित होते.

तुलियो म्हणाले, की रेईश मागूश येथील विकास क्षेत्र नसलेल्या (नो डेव्हल्पमेंट झोन) जागेवर म्हणजेच डीएलएफजवळ स्पार्क हेल्थलाईन प्रा. लिमिटेड या कंपन्यांंचे ३५ हजार चौरस मी. क्षेत्रात प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांविषयी अधिसूचना आल्यानंतर आम्ही त्यास आक्षेप नोंदविले होते.

ते पुढे म्हणाले, गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या (Goa Industrial Development Corporation) कार्यालयात ३ सप्टेंबर रोजी या प्रकल्पाविषयी सुनावणी झाली, त्यावेळी तेथील या प्रकल्पास विरोध करणारे ग्रामस्थ व मच्छीमार उपस्थित होते. त्या ठिकाणी आलेल्या ग्रामस्थांनी व मच्छीमारांनी हा प्रकल्प नको असे सांगत त्या प्रकल्पास विरोध केला.

डोंगरावर असलेल्या या प्रकल्पास रस्ता नसताना उतरणीवर हा प्रकल्प बांधला जात आहे. येथील लोकांच्या माथी हा प्रकल्प मारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जीआयडीसीच्या कार्यालयात झालेल्या या सुनावणीला गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा (आयपीबी) एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. आयडीसीने त्यांना बोलाविले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अजूनही आम्हाला त्याबाबत काहीही सांगितले नाही.

नोकऱ्यांची श्वेतपत्रिका काढा

तुलियो म्हणाले, आयपीबीने हा मोठा घोटाळा केला असून क्रोनी कॅपिलिस्टचे प्रकल्प लोकांच्या माथी मारले जात आहेत. राज्य सरकारने किती स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या याविषयी श्‍वेतपत्रिका काढावी. मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची ताकद असेल, तर त्यांनी अशा मेगा प्रकल्पांची तपासणी करावी, असे आव्हान त्यांनी दिले. याच डोंगरावरील ‘डीएलएफ’च्या प्रकल्पासाठी आमदार केदार नाईक यांनी २०२० साली परवान्यावर सही केली होती. आता २०२२ मध्ये या प्रकल्पाच्या परवान्यासाठी विद्यमान सरपंचांनी सही मारली आहे. लोकांची काळजी असेल तर तो प्रकल्प आमदार नाईक यांनी बंद करावा. आयपीबी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणली जात आहे, त्यास कोणी परवानगी दिली असा सवाल त्यांनी केला.

रेईश मागूशवरही प्रकल्पांचे भूत

कवठणकर म्हणाले, की भूतानी इन्फ्राच्या प्रकल्पावरून राज्यभर वादळ निर्माण झालेले आहे. त्यामुळे सरकारातील बेकायदा झालेल्या भूरूपांतरणाचे प्रकरण बाहेर आले आहे. भूतानीच्या प्रकल्पाला जसा विरोध केला आहे, दक्षिण गोव्यात ज्याप्रमाणे भूतानीचे भूत बसले आहे, तसे उत्तर गोव्यातही रेईश मागूशच्या डोंगरावर ‘डीएलएफ’ आणि दुसरे स्पार्क हेल्थलाईन प्रा. लिमिटेडचे भूत बसलेले आहे. रेईश मागूशचा डोंगर या दोन्ही प्रकल्पांनी संपविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT